हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे एका संन्यासी व्यक्ती करुन मोठा लढा दिला. स्वामी रामानंद तीर्थ ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर यांची आज जयंती. एक संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ हे चळवळकर्ते होते. त्यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा रवा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी त्यांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले. ७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले.‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्त्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली
03 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
03 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
03 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष