महिलांचे हार्मोन्स का संतुलित राहत नाहीत (फोटो सौजन्य - Canva)
बऱ्याचदा, महिला स्वतःच अशा सवयींमुळे या समस्येत योगदान देतात ज्या त्यांना कळतही नाहीत. नकळतपणे अनेक महिलांच्या सवयी हार्मोनल असंतुलन होण्यासाठी कारणीभूत ठरतात. आता या नक्की कोणत्या सवयी आहेत आणि महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाची काही प्रमुख कारणे शोधूया.
झोपेचा अभाव
दररोज किमान ७-८ तासांची झोप आवश्यक आहे. झोपेचा अभाव कॉर्टिसॉल (तणाव संप्रेरक) वाढवतो, जो इतर संप्रेरकांना बिघडू शकतो. सकाळी उठल्यापासून काम आणि अजिबात स्वतःकडे लक्ष न देणं, केवळ ४-५ तास झोपणं अशी सवय अनेक महिलांना असते, कारण त्यांची घरातील आणि ऑफिसमधील कामंच संपत नाहीत आणि साहजिकच याचा परिणाम हार्मोन्सवर होतो.
हार्मोनल असंतुलन दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, आरोग्यासाठी ठरतील वरदान
जास्त ताण

सतत कामाचा ताण येणे
सतत चिंता आणि मानसिक दबाव हार्मोनल संतुलन बिघडवतो. याचा थायरॉईड, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनवर परिणाम होतो. घर आणि ऑफिसचा ताण सतत येऊन महिलांच्या आरोग्यावर त्वरीत परिणाम होताना दिसून येतो आणि तरीही अनेक महिला आपल्या तब्बेतीकडे लक्ष देत नाहीत.
जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे
पॅक केलेले पदार्थ, जास्त साखर आणि जास्त चरबीयुक्त आहार हार्मोन्समध्ये बिघाड निर्माण करतात, ज्यामुळे पीसीओडी सारख्या समस्या उद्भवू शकतात. सध्या बाहेरचे खाणे सर्वांचेच वाढले आहे आणि यात महिलाही कमी नाहीत. घरात पदार्थ करायला वेळ नसल्यामुळे सतत बाहेर खाल्ले जाते आणि त्याचा परिणाम हार्मोन्स संतुलनावर होताना दिसतो.
कॅफिन आणि साखरेचे जास्त सेवन
खूप जास्त चहा, कॉफी किंवा मिठाईचे सेवन केल्याने इन्सुलिन आणि कोर्टिसोल पातळी बिघडू शकते. कामाच्या वेळेत सतत चहा वा कॉफी पिणे, सतत गोड खाणे यामुळेदेखील हार्मोनल असंतुलन घडत असलेले दिसून येते.
हार्मोन्स संतुलनासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
शारीरिक हालचालींचा अभाव

व्यायाम न करणे वा अति व्यायाम करणे
व्यायामाचा अभाव चयापचय कमकुवत करतो, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. दिवसभर खुर्चीवर बसून काम करणे, घरी गेल्यानंतर घरच्या कामात गुंतून जाणे. यामुळे स्वतःकडे लक्ष दिले जात नाही आणि व्यायामही केला जात नाही आणि सर्वस्वी परिणाम हार्मोन्सवर होताना दिसतो. जास्त व्यायामदेखील घातक आहे. बऱ्याच महिला ओव्हर व्यायाम करताना दिसतात. जास्त व्यायामामुळे शरीरावर ताण वाढतो, ज्यामुळे महिलांच्या हार्मोन्सवर परिणाम होतो.
वेळेवर न जेवणे
अनियमितपणे खाणे किंवा रात्री उशिरा जेवल्याने शरीराचे घड्याळ बिघडते, ज्याचा थेट परिणाम हार्मोन्सवर होतो. याशिवाय कमी पाणी पिणे हेदेखील एक कारण आहे. निर्जलीकरणामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, ज्यामुळे हार्मोनल संतुलन बिघडू शकते. त्यामुळे तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या आहाराकडे आणि नियमित वेळाकडे लक्ष दिले पाहिजे.
तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे

कामाचा येणारा ताण
नियमित आरोग्य तपासणी न करणे आणि शरीराच्या सिग्नलकडे दुर्लक्ष करणे देखील हार्मोनल असंतुलनास कारणीभूत ठरते. निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि मानसिक शांती याद्वारे महिला त्यांचे हार्मोन्स संतुलित ठेवू शकतात आणि चांगले आरोग्य उपभोगू शकतात.






