ice cream city
आईस्क्रीम खायला सर्वांनाचं फार आवडते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रीम प्रेमी बघायला मिळतात. उन्हाळा असो वा हिवाळा आईस्क्रीम प्रत्येक ऋतूत चवीला छानच लागते. अनेकजण तर आजरी असतानाही आईस्क्रीमचा आस्वाद घेण्याची संधी चुकवत नाहीत. आजकाल तर आईस्क्रीमची लोकप्रियता इतकी वाढली आहे की कोणत्याही एका देशापुरती मर्यादित राहिली नसून आता जगभर आईस्क्रीम आवडीने बनवली आणि खाल्ली जाते. आता आईस्क्रीमचे अनेक वेगवगेळे आणि सिजनल फ्लेवर्सदेखील उपलब्ध झाले आहेत.
आईस्क्रीमप्रति लोकांचे प्रेम आणि लोकप्रियता पाहूनच दरवर्षी जुलै ,महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जागतिक आईस्क्रीम दिन साजरा केला जातो. यंदाचा आईस्क्रीम दिवस आज म्हणजेच 21 जुलै रोजी साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण जगभरात आजचा दिवस फार उत्साहात साजरा केला जात आहे. म्हणूनच आज या आईस्क्रीम दिनानिमित्त आम्ही तुम्हाला आईस्क्रीम सिटीची माहिती सांगणार आहोत. होय. तुम्ही बरोबर ऐकले, भारतात असेही एक शहर आहे, ज्याला आईस्क्रीम सिटी म्हणून ओळखले जाते.
हेदेखील वाचा – National Ice Cream Day 2024: सर्वात पहिली आईस्क्रीम कोणी आणि कधी बनवली? जाणून घ्या रंजक कथा
आपल्या देशात अनेक शहरे आहेत. यातीलच कर्नाटक राज्यातील मंगळूर शहराला प्रामुख्याने आईस्क्रीम सिटी म्हणून ओळखले जाते. या शहरातील वाढत्या डेरी प्रोडक्टसमुळे हे शहर आईस्क्रीम हब बनले आहे. त्यामुळेच या शहराला आईस्क्रीम सिटी म्हणून ओळखले जाते.

मंगळूर शहरात तुम्हाला भरपूर आईस्क्रीम पार्लर बघायला मिळतील. या शहरातील गल्ल्या या आईस्क्रीम पार्लरने गच्च भरलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारच्या आणि निरनिराळ्या फ्लेवर्सच्य आईस्क्रीमचा स्वाद घेता येईल. तसेच या जागी एक सर्वात मोठे आईस्क्रीम पार्लरदेखील आहे, जिथे एकूण 300 आरामात बसून आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ शकतात.
आईस्क्रीम सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळूरमध्ये अनेक प्रकारच्या आईस्क्रीम चाखायला मिळतील. मात्र याच्या प्रसिद्ध आईस्क्रीमविषयी बोलणे केले तर ‘गडबड आईस्क्रीम’ इथली सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आईस्क्रीम आहे. त्यामुळे तुम्ही या शहराला जेव्हाही भेट द्याल तेव्हा या आईस्क्रीमचा आस्वाद नक्की घ्या.






