
Female Doctors
दरवर्षी ३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला चिकित्सक दिवस साजरा केला होता. हा दिवस अमेरिकेच्या पहिल्या महिला डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांच्या स्मरणार्थ प्रथम अमेरिकेत साजरा करण्यात आला. आज वैद्यकीय क्षेत्रात अनेक महिला डॉक्टर पुरुषांच्या बरोबरीने मजबूत पाया बनून उभ्या राहिल्या आहेत. रुग्णालये, संशोधन संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे नेतृत्व करत आहे. आजचा दिवस हा महिला डॉक्टरांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचा सन्मानासाठी करण्याचे प्रतीक म्हणून जगभरात साजरा केला जातो. या निमित्त आपण भारतातील वैद्यकीय क्षेत्रात पाया रोवणाऱ्या, पुरुषप्रधान काळात मजबूतपणे या क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या महिला चिकित्सकांचा प्रवास थोडक्या शब्दात जाणून घेणार आहोत.
भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील महिला डॉक्टरांचा प्रवास संघर्षमयी आणि प्रेरणादायी आहे. ज्या काळात महिलांनी शिक्षण घेणेही पाप मानले जायचे, अशा अतिशय कठीण परिस्थितीतून वाट काळात समाजासाठी भारतीय महिलांनी आपले योगदान दिले आहे. आज या महिला प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी बनल्या आहे.
डॉ. आनंदीबाई जोशी
या सगळ्यात सर्वात मोठा वाटा भारताच्या पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांचा होता. तुम्हाला आनंदीबाई जोशींचा परिचय पुस्तकांमधून, चित्रपटांमधून झाला असेलच. वालविवाह, मातृत्वातील दु:ख आणि सामाजिक बंधने या सर्व कठीण प्रसंगाना लढा देत त्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या. त्यांच्या या संघर्षात त्यांना साथ लाभली ती त्यांचे पती गोपाळराव जोशी यांची. महिलांच्या प्रसूतीसाठी त्या काळात डॉक्टर नसायचे, यामुळे आंनदीबाई यांना वेळेत उपचार न मिळाल्याने आपले मूल गमवावे लागले होते. हाच प्रसंग त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्यांनी डॉक्टर बनण्याचा निर्धार करत अमेरिकेत जाऊन पदवी मिळवली आणि त्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. त्यांचा हा प्रवास महिलांसाठी क्रांतीकारी आणि महिलांच्या शिक्षणाचे महत्व मांडणारा ठरला.
डॉ. भक्ती यादव
भारताच्या पहिल्या महिला स्रीरोगतज्ज्ञ डॉ. भक्ती यादव, ज्यांना डॉक्टर दादी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ग्रामीण आणि गरीब महिलांच्या सेवेसाठी वेचले. MGM मेडिकल कॉलेजमधून MBBS पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महिल्या विद्यार्थीनी होत्या. त्यांनी वात्सल्य नर्सिंग होमची स्थापन करत महिलांसाठी मोफत उपचार सुरु केले. त्यांच्या या कार्यसाठी त्यांना २०११ मध्ये पद्मश्री पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. ३ एप्रिल १९२६ रोजी उज्जेनमधील महिपूर येथे त्यांचा जन्म झाला होता.
डॉ. इंदिरा अहुजा
मध्ये भारतातील पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म घडवून आणणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉ. म्हणजे इंदिरा अहुजा आहेत. त्यांनी प्रजनन वैद्यकशास्त्रात आपले मोलाचे योगदान दिले आहे. १९८६ मध्ये टेस्ट ट्युब बेबीचा जन्म घडवून त्यांनी नि:संतान दाम्पत्यांना एक नवा आशेचा किरण दिला. त्यांच्या या योगदानाने आनेक महिलांना आई होण्याचे सुख अनुभवायला आजही मिळते. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना २०११ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
डॉ. एम.व्ही. पद्मा श्रीवास्तव
डॉ. एम.व्ही. पद्मा श्रीवास्तव यांनी भारताच्या सर्वात प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट म्हणून ओळखले जाते.१९९० मध्ये त्यांनी न्यूरोलॉजीत मास्टर डिग्री घेतली. कोड रेड कार्यक्रम सुरु करुन त्यांनी हजारो लोकांचे जीव वाचवले. पद्मा श्रीवास्तवर या न्यूरोलॉजिस्ट असण्यासोबतच एक उत्तम लेखिकाही होत्या. या चारही महिलांनी वैद्यकीय क्षेत्रात नवे मापदंड उभारले होते, जे आज प्रत्येक भारतीय महिलेसाठी प्रेरणादायी ठरत आहे.