आकाराने लहान, पण सुंदर आणि चपळ म्हणून ‘किंगफिशर’ या (kingfisher Bird) पक्ष्याला ओळखले जाते. अनेक वेगवेगळ्या वैशिष्ट्यामुळे हा पक्षी अत्यंत खास बनतो. या इवल्याशा पक्ष्याला पाहिल्यास हा रोज किती खात असेल. असा प्रश्न पडतो. मात्र, या संबंधीची माहिती ऐकून थक्क व्हाल अशीच आहे. कारण हा पक्षी रोज आपल्या वजनापेक्षा तब्बल २४ ते २६ पटीने जास्त खातो. (eats 24 times as much as weight) मासा आणि लहान साप हे त्याचे आवडते खाद्य आहे.
किंगफिशर हा एक कोरासीफोर्म्स समूहातील मध्यम आकाराचा पक्षी असून तो प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि आशियात आढळतो. या पक्ष्याच्या एकूण ९० प्रजाती जगभरात विखुरल्या आहेत. या पक्ष्याची विशेष शारिरीक रचनाच त्यांना एक चांगला शिकारी बनवतो. किंगफिशरची खाण्याची सवय मात्र आश्चर्यचकित करणारी आहे. तो दिवसातून किमान चारवेळा खातो. प्रत्येकवेळी त्याचे खाणे आवश्यकतेपेक्षा जास्त होते. यामुळे तो उलटी करुन ते बाहेर टाकून देतो.
[read_also content=”कोणत्याही कोनात आणि कसंही वळतं याचं शरीर; तुम्हीच वाचा कोण आहे भारताचा ‘रबर बॉय’ https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/its-body-turns-at-any-angle-and-in-any-way-yash-shah-is-the-rubber-boy-of-india-47797/”]