१३ जून रोजी दरवर्षी जागतिक सॉफ्टबॉल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Softball Day : १३ जून रोजी दरवर्षी जागतिक सॉफ्टबॉल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस सॉफ्टबॉल या लोकप्रिय आणि उत्साही संघ खेळाचा जागतिक स्तरावर गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसामागील मुख्य उद्देश तरुण मुला-मुलींना खेळातून सशक्त बनवणे, नेतृत्वगुण, संघभावना आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीच्या दिशेने प्रेरित करणे हा आहे.
१८८७ मध्ये शिकागो येथे पत्रकार जॉर्ज हॅनकॉक यांनी सॉफ्टबॉलचा शोध लावला. सुरुवातीला इनडोअर खेळ म्हणून विकसित झालेल्या या खेळाला ‘इनडोअर बेसबॉल’, ‘मशबॉल’, किंवा ‘किटनबॉल’ अशा नावांनी देखील ओळखले जाई.
१९३३ मध्ये अमेच्योर सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ अमेरिका (ASAA) ची स्थापना झाली आणि याच क्षणापासून महिलांनी सॉफ्टबॉलमध्ये सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैनिकांनी ज्या ज्या देशांमध्ये तैनात होते, तेथे त्यांनी हा खेळ शिकवून सॉफ्टबॉलचा प्रसार जागतिक स्तरावर केला.
१९६५ मध्ये आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल फेडरेशन (ISF) ची स्थापना झाली. या संघटनेचे मुख्यालय फ्लोरिडा, अमेरिका येथील प्लांट सिटी येथे आहे. आज ISF मध्ये १२७ हून अधिक राष्ट्रीय संघटनांचा सहभाग आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘लग्न न करण्याचा ट्रेंड’ वाढतोय! जपान आणि स्वीडनमध्ये सर्वाधिक अविवाहित मुली; कारण ऐकून व्हाल थक्क
हा दिवस सामूहिक सहभाग, आरोग्य, आणि मैत्री यांचा उत्सव आहे. सॉफ्टबॉलसारखा खेळ सहकार्य, एकाग्रता, नेतृत्वगुण आणि स्पर्धात्मकता शिकवतो.
साजरा कसा करावा?
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘City Killer’ लघुग्रह चंद्रावर विनाश घडवू शकतो; संभाव्य टक्कर शास्त्रज्ञांसाठी ठरणार ऐतिहासिक प्रयोग
सॉफ्टबॉल हा केवळ खेळ नाही, तर तो एका विचारसरणीचे आणि एकतेचे प्रतीक आहे. आजच्या काळात, जेव्हा मुलांना डिजिटल विश्वापासून खेळांकडे वळवण्याची गरज आहे, तेव्हा जागतिक सॉफ्टबॉल दिनाची भूमिका अधिकच महत्त्वाची ठरते.
हा दिवस प्रत्येकाने आपल्या परिसरात खेळाच्या माध्यमातून आनंद, आरोग्य आणि संघभावना जोपासण्यासाठी साजरा करावा – हीच या दिवसामागील खरी प्रेरणा!






