का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवस? काय आहे यंदाची थीम? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आज विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जात आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या क्षेत्रांमधील महिला आणि मुलींच्या महत्त्वपूर्ण कामिगरीला सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची ओळख पटवण्यासाठी 11 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरातील महिला आणि मुलींच्या लैंगिक समानतेचे आणि सक्षमीकरणाचे महत्त्व दर्शवणार दिवस आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांचे योगदान साजरे करण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली.
विज्ञान हे केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित न राहता 21व्या शतकात अधिक गतिशील, सहयोगी आणि विविधांगी झाले आहे. विज्ञानाच्या मदतीने जागतिक समस्या सोडवण्याचे कार्य केले जाते, यामुळे या क्षेत्रात महिलांची संख्या वाढणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दिल्लीतील सरकार घडले आता निशाण्यावर बिहार, पुढच्या टास्कसाठी BJP चा नवा प्लान तयार
काय आहे इतिहास?
2011 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला स्थिती आयोगाच्या (Commission on the Status of Women) 55व्या सत्रात शिक्षण, प्रशिक्षण आणि विज्ञान व तंत्रज्ञानातील महिलांच्या सहभागाविषयी एक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात महिलांना विज्ञान क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर, डिसेंबर 2013 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमासंबंधी एक ठराव मंजूर केला, यामध्ये आणि मुलींना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात समान संधी मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. नंतर 11 फेब्रुवारी 2015 ला या संयुक्त राष्ट्रसंघाकडून या दिवसाची घोषणा करण्यात आली.
आजच्या काळात तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक विषयांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. मात्र, यामध्ये अजूनही मोठी तफावत असून यामध्ये लैंगिक समानता आणणे गरजेचे आहे. यासाठी हा दिवस साजर करण्यात येतो. उच्च शिक्षणात महिलांचा सहभाग वाढला असला तरी या क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधीत्व अजूनही कमी आहे. यामुळे यासाठी अनेक महत्त्वाची पाऊले उचलण्याची गरज आहे.
काय आहे यंदाची थीम?
आज 2025 चा विज्ञानातील महिला आणि मुलींचा 10वा आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जात आहे. यावर्षीची थिम ‘Unpacking STEM careers: Her Voice in Science’ म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील करिअर संधी उलगडणे आणि यामध्ये महिलांचा योगदान अधोरेखित करणे आहे.
लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरण
संयुक्त राष्ट्रसंघानुसार, लैंगिक समानता आणि महिलांचे सशक्तीकरण हे जागतिक आर्थिक विकासासोबतच 2030 च्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महत्त्वाचे योगदान देऊ शकते. यामुळे महिलांना विज्ञान क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना आवश्यक संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. हा दिवस विज्ञान क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा आणि त्यांना समान संधी देण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प आहे. STEM क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
सीमा भागातील संरक्षण क्षमता सुधारण्याचे भारताचे उद्दिष्ट; बजेटमध्ये निधीची ९.५ टक्क्यांची वाढ