World Hippo Day: 'हे' गोंडस प्राणी पाण्यात डुंबतात, गवत खातात, त्यांच्या शक्तिशाली जबड्यांनी सर्वांच आश्चर्यचकित करतात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Hippo Day : जगभरातील अनेकांना हिप्पो म्हणजे पाण्यात उड्या मारणारा, गवत चघळणारा आणि आपल्या मजबूत जबड्यांनी थक्क करणारा प्राणी म्हणून परिचित आहे. या गोंडस आणि अद्वितीय प्राण्यांना समर्पित जागतिक हिप्पो दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिप्पोंबद्दल असलेले कुतूहल, त्यांचे जैवविविधतेतील स्थान आणि त्यांच्या संवर्धनाच्या गरजेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा विशेष दिवस पाळला जातो.
हिप्पोंचा ऐतिहासिक महत्त्व आणि श्रद्धा
हिप्पोंचा आफ्रिकन संस्कृतीत आणि लोककथांमध्ये फार मोठा प्रभाव आहे. झुलू योद्धे त्यांच्या शौर्यासाठी हिप्पोंचा आदर करतात, तसेच प्राचीन इजिप्तमध्ये देवी तावेरेटच्या रूपात हिप्पोची पूजा केली जात होती. आजही अनेक आफ्रिकन समुदाय या प्राण्यांना शुभ मानतात.
जागतिक हिप्पो दिन कसा साजरा करावा?
हिप्पोंचा इतिहास आणि त्यांच्या संवर्धनाची गरज
तज्ज्ञांच्या मते, हिप्पो प्रजातींचा उगम सुमारे आठ दशलक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेत झाला. ते घोडे आणि डुकरांसारखे दिसत असले तरी, व्हेल, डॉल्फिन आणि पोर्पोइसेस यांच्याशी त्यांचे अधिक जवळचे नाते आहे. सध्या, केवळ दोन प्रकारचे हिप्पो अस्तित्वात आहेत. सामान्य हिप्पो आणि छोट्या पिग्मी हिप्पो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ कृतीने भारतीयांचे हृदयच जिंकले; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
गेल्या काही दशकांत हिप्पोंच्या संख्येत मोठी घट झाली आहे. International Union for Conservation of Nature (IUCN) ने २००६ मध्ये त्यांना ‘असुरक्षित प्रजाती’ म्हणून घोषित केले. मांस आणि हस्तिदंतासाठी होणारी शिकार, तसेच त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे नष्ट होणे ही त्यांची संख्या कमी होण्यामागची मुख्य कारणे आहेत.
हिप्पोंशी संबंधित काही रोचक तथ्य
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia युरोपमध्ये मोठे युद्ध सुरू करण्याच्या तयारीत; नाटोच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले ‘हे’ धक्कदायक तथ्य
जागतिक हिप्पो दिन का साजरा करावा?
हिप्पो हे जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग असून पर्यावरणीय समतोल राखण्यात मोठी भूमिका बजावतात. जागतिक हिप्पो दिन साजरा करून आपण या विलक्षण प्राण्यांविषयी जागरूकता वाढवू शकतो आणि त्यांच्या संवर्धनासाठी योगदान देऊ शकतो. त्यामुळे, १५ फेब्रुवारीला या अद्भुत जलचर प्राण्यांचा सन्मान करूया!