(फोटो सौजन्य: istock)
पुरेसे पाणी प्या.
आपल्या शरीराच्या अनेक समस्या या पाण्याच्या कमतरतेशी संबंधित असतात. शरीरातील पाण्याचा साठा आपल्या शरीराला आतून स्वच्छ ठेवण्यास आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करते. रोजच्या जीवनात किमान ७-८ ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. पाण्याव्यतिरिक्त, सूप, फळांचे रस, नारळ पाणी आणि स्मूदी अशा पदार्थांचेही सेवन केले जाऊ शकते. यामुळे शरीराला हायड्रेशन मिळते.
कॉम्प्रेशन सॉक्सचा वापर
पाय सुजण्याचे एक प्रमुख कारण रक्तवाहिन्यांशी संबंधित असू शकते, जे रक्त साचल्यामुळे होते. आराम मिळविण्यासाठी कॉम्प्रेशन सॉक्स हा एक उत्तम पर्याय असू शकतो. हे सॉक्स पायांवर हलका दाब देतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. तथापि, जर एखाद्या व्यक्तीला हृदयरोग असेल तर त्यांनी ते वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
उशांनी तुमच्या पायांना आधार द्या
जर तुमचे पाय सतत सुजत असतील तर बसताना किंवा झोपताना पायांखाली उशी ठेवून झोपायला सुरुवात करा. यामुळे द्रवपदार्थाचा प्रवाह सुधारतो आणि सूज कमी होते. प्रेग्नंसीच्या वेळीही ही पद्धत फार फायद्याची ठरते.
आहारात मीठाचे प्रमाण कमी ठेवा
पदार्थाची चव वाढवण्यासाठी मीठाचा वापर केला जात असला तरी याचा अतिवापर मात्र आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. प्रोसेस फूड, पॅकेज्ड फूड यामध्ये मीठाचे प्रमाण सर्वाधित आढळून येते. याऐवजी तुम्ही आहारात ताजे, घरी शिजवलेल्या अन्नाचा समावेश करु शकतो. तुमच्या आहारत मीठाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करा.
तुमचे वजन नियंत्रणात ठेवा
जास्तीच्या वजनामुळे पायांवर दबाव येतो आणि याचा रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे पायांची सूज वाढते. पाैष्टिक आहार आणि नियमित व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात करता येऊ शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






