हिजाब प्रकरणात (Hijab Controversy) निर्णय देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे (Karnataka High Court) मुख्य न्यायाधीश रितु राज अवस्थी (Ritu Raj Awasthi) यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. न्यायालयाने हिजाब प्रकरणी 15 मार्च रोजी निकाल दिला होता. त्यावरुनच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ जारी करत, ही धमकी देण्यात आल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, धमकीचे वृत्त पुढे येताच कर्नाटक सरकारने या प्रकरणात सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरु येथे बोलताना न्यायाधीशांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे. बसवराज बोम्मई यांनी म्हटले की, हिजाब घालून निकाल देणाऱ्या तीनही न्यायाधीशांना आम्ही ‘Y’ श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी डीजी आणि आयजी यांना विधानसौधा पीएसमध्ये दाखल केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत ज्यात काही लोकांनी न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत, असेही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेंगळुरूमध्ये म्हटले.
[read_also content=”पाकिस्तानी सैन्याचा मोठा तळ असलेल्या सियालकोटच्या आर्मी भागात एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट https://www.navarashtra.com/world/explosion-in-sialkot-military-base-many-blasts-near-army-area-pakistans-most-important-cantonment-area-see-the-details-here-nrvb-257246.html”]
[read_also content=”रशियन सैन्याने आर्ट स्कूलवर केला बॉम्ब हल्ला, ४०० युक्रेनियन नागरिकांनी घेतला आश्रय https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/russian-army-bombed-art-school-400-ukrainians-were-hiding-here-mostly-buried-under-rubble-257257.html”]