राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे निकाल
ZP Election Results Live Update : जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. त्यानंतर आचारसंहिता उठवली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी एकूण २६२४ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीची मतमोजणी सकाळी दहापासून सुरु होणार असल्याची माहिती दिली जात आहे. त्यानंतर राज्यातील निवडणुकीचे कल समोर येणार आहेत. यामुळे राज्यभरातील ७४३८ उमेदवारांची धाकधूक आणखी वाढली आहे.
निवडणुकीच्या आयोजित कार्यक्रमानुसार, ५ फेब्रुवारीला मतदान होऊन ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर केले जाणार होते. मात्र, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आता या निवडणुकीत राज्यभरातील ७४३८ उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले आहे. १२ जिल्हा परिषद क्षेत्रात सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी एकूण २६२४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीची मतमोजणी आज होणार असून, त्यानंतर आचारसंहिता उठवली जाणार आहे.
09 Feb 2026 02:13 PM (IST)
खासदार संदिपान भुमरे,आमदार विलास भुमरे यांचा शिवसेनेने 14 जागा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दोन जागावर असून भूमरेनी गड राखला
09 Feb 2026 02:05 PM (IST)
कोकणातील कोलगावमध्ये निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांनी भाजपचे उमेदवार आणि जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांचा पराभव करत विजय मिळवला. याचबरोबर पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या प्रणाली टिळवे विजयी झाल्याने भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला.
09 Feb 2026 01:55 PM (IST)
शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी उडवला भाजपचा धुव्वा
खानापूर पंचायत समितीत शिवसेनेचे उमेदवार विजयी
09 Feb 2026 01:49 PM (IST)
एकूण जागा – 73, 43 जागांचा निकाल जाहीर
भाजप- 7
शिवसेना- 4
राष्ट्रवादी- 28
शरद पवार गट – 1
ठाकरे गट – 3
काँग्रेस – 0
अपक्ष – 0
09 Feb 2026 01:31 PM (IST)
विक्रांत जाधव विजयी (UBT) -
प्रमोद गांधी विजयी (मनसे)
महेश नाटेकर विजयी (शिवसेना)
अपूर्वा बारगोडे विजयी (BJP )
नेत्रा ठाकूर (शिवसेना )
09 Feb 2026 12:44 PM (IST)
पनवेल - तालुक्यातील आठ जिल्हा परिषद मतदार संघा पैकी एक असलेल्या वावंजे मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने विजय संपादित केला आहे या ठिकाणी पंचायत समितीच्या दोन जागा देखील भाजपाच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत.
वावंजे जिल्हा परिषद गटातून भाजप महायुतीच्या कमला देशेकर विजयी,
वावंजे पंचायत समिती गणातून आरती काठे आणि चिंध्रण मधून अंकुश खैर विजयी,
भाजपचा पनवेल तालुक्यातील पहिला मोठा विजय,
वावंजे जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीत शेकापचा दारुण पराभव !
09 Feb 2026 12:32 PM (IST)
तिसऱ्या फेरीअखेर नागेवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या उमेदवार डॉ. शीतल बाबर 4163 मतांनी आघाडीवर
नागेवाडी गणामधून शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा भोसले 199 मतांनी आघाडीवर
गार्डी गणामधून शिवसेनेच्या उमेदवार
प्रतिभा शेंडे 2594 मतांनी आघाडीवर
लेंगरे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या उमेदवार मनीषा बागल 1211 मतांनी आघाडीवर
लेंगरे गणामधून शिवसेनेच्या उमेदवार
पायल कदम 954 मतांनी आघाडीवर
पारे गणामधून शिवसेनेच्या उमेदवार
तेजश्री लोखंडे 552 मतांनी आघाडीवर
करंजे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवार प्रिया पाटील 343 मतांनी आघाडीवर
बलवडी (खा) गणामधून शिवसेनेचे उमेदवार
सुहास शिंदे 160 मतांनी आघाडीवर
करंजे गणामधून भाजपचे उमेदवार शिवाजी माने 189 मतांनी आघाडीवर
भाळवणी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे उमेदवार हिम्मत जाधव 1087 मतांनी आघाडीवर
आळसंद गणामधून शिवसेने…
वाकुर्डे गटातून व गणातून राष्ट्रवादी काँग्रेसची शिवाजी नाईक यांच्या सुन विजयी
09 Feb 2026 12:21 PM (IST)
कळवंडे- मयुरी शिर्के
पेढे गटात भाजपच्या दीप्ती महाडिक खेर्डी गटात भाजपच्या रावी मोरे अलोरे गटात विनया झगडे
शिरगाव गटात शिवसेना-भाजप युतीच्या दीक्षा कांबळे
उमरोली गटात शिवसेना उबाठाचे प्रमोद निवळकर
वहाळ गटात शिवसेना उबाठाच्या पूर्वा जाधव
कोकरे गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे संजय कदम आघाडीवर
09 Feb 2026 12:14 PM (IST)
साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजित सपकाळ विजयी झाले आहेत.
09 Feb 2026 12:10 PM (IST)
रत्नागिरी जिल्हा परिषद महायुतीचे 9 उमेदवार आघाडीवर..
तर महाविकास आघाडी सध्या पिछाडीवर...
एक अपक्ष आघाडीवर...
09 Feb 2026 11:49 AM (IST)
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भराडी मातेचे दर्शन घेतले
जिल्हा परिषद निवडणूक निकालावर आपल्या सर्वांवर दुःखाचे सावट आहे. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले दुःखद निधन या भावनेत सर्व महाराष्ट्र आहे.
राज्यातील नेमका निकाल मी पाहिला नसला तरी महायुतीचा विजय निश्चित आहे.
सिंधुदुर्गातही महायुतीचा विजय दैदीप्यमान असेल.
वैभव नाईक यांच्याशी चर्चा झाली, एका गावातील आणि एका जिल्ह्यातील आम्ही आहोत. विधानसभेत एकमेकांचे सहकारी राहिलोत. त्यामुळे त्यांची विचारपूस केली.
मी येथे देवीच्या दर्शनासाठी आलोय, राजकीय भाष्य नको
09 Feb 2026 11:47 AM (IST)
पहिली फेरी
श्रीराम इदाते आघाडीवर
श्रीराम इदाते (भाजप) - 460
मंगेश पवार (शिवसेना) - 147
मंगेश मोरे (काँग्रेस)- 9
नोटा - 20
09 Feb 2026 11:45 AM (IST)
शेकापचा बालेकिल्ला नेस्तनाबूत
भाजपच्या चित्रा पाटील पराभूत
अलिबाग पंचायत समिती च्या चार जागा शिवसेनेच्या ताब्यात
09 Feb 2026 11:36 AM (IST)
हर्णै जिल्हा परिषद गट शिवसेनेच्या ऐश्वर्या धाडवे आघाडीवर
पंचायत समिती जुईकर मोहल्ला शिवसेनेचे उमेश राजे आघाडीवर
09 Feb 2026 11:32 AM (IST)
पेढे
मोहन शिंदे, इंगवले, शिंदे पुढे
अलोरे
झगडे, देवरुखकर पुढे
शिरगांव
साळवी, रहाटे, खेतले आघाडी वर
शिरगाव पंचायत समिती गणात
स्नेहा साळवी 22 व युतीचे उमेदवार नयना पवार यांना 8 मतं पोस्टल
09 Feb 2026 11:32 AM (IST)
उरण, विरेश मोडखरकर
जिल्हापरिषद: म.वी.आ.च्या प्रेरणा कुणाल पाटील ४४१९ मतांनी विजयी
पंचायात समितीचे उमेदवार: म.वी.आ.चे परेश धनाराजी ठाकूर आणि दीपक सुरेश भोईर हे विजयी झाले आहेत.
भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात रंगलेल्या थेट लढतिमध्ये पाहिल्याच फेरीमध्ये नवघरमधून म. वी.आ. ने जिल्हापरिषद १ आणि पंचायात समितीच्या २ अशा एकूण ३ जागा जिंकून आपले अस्थीत्व सिद्ध केले आहे.
09 Feb 2026 11:31 AM (IST)
पहिली फेरी
विक्रांत भास्कर जाधव
(उबाठा) - 1101
संतोष लक्ष्मण जैतापकर (शिवसेना) - 530
फरहान नजी खान सरगुरो (राष्ट्रवादी काँग्रेस) - 48
अरुण महादेव भुवड
(अपक्ष) - 3
बळीरासेना पुरस्कृत
09 Feb 2026 11:31 AM (IST)
केळशी गटातून मधून शिवसेनेचे नितीन दुर्गवळे आघाडीवर
जलगाव गटातून जिल्हा परिषद गटातून किशोर देसाई आघाडी
दाभोळ गटातून शिवसेनेच्या साधना महाजन आघाडीवर
09 Feb 2026 11:05 AM (IST)
रत्नागिरी - गोळप पंचायत समिती गणातून उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील 800 मतांनी आघाडीवर
09 Feb 2026 11:02 AM (IST)
जिल्हा परिषद भरणे गटातून शिवसेनेचे सचिन विश्राम धाडवे हे टपाली मतदानात 249 मते घेऊन आघाडीवर तर उबाठा रामचंद्र आखाडे 66
19 खवटी पंचायत समिती गटातून उभाटाच्या सुहासिनी कृष्णा चिंचगरकर यांना 96 तर नम्रता संतोष तांबट यांना 208 नोटाला 18 असे तीनशे बावीस टपाली मतदान झाले असून शिवसेनेच्या नम्रता तांबट या कवटी पंचायत समिती गटातून आघाडीवर आहेत
भरणे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या मानसी महेश जगदाळे या टपाली मतदानात 674 मते घेऊन आघाडीवर तर ubt च्या सुहासिनी कृष्णा चिंचघरकर यांना 198 मते एकूण 900 टपाली मतदानाचा हा निकाला
भरणे पंचायत समिती गटातून शिवसेनेचे प्रशांत पांडुरंग चव्हाण 405 मते घेऊन आघाडीवर
तिसंगी पंचायत समिती गटातून शिवसेनेचे महेंद्र भोसले 140 मतांनी आघाडीवर
09 Feb 2026 11:01 AM (IST)
एकूण जागा : 56 उमेदवार रिंगणात--151
भाजप- 00
शिवसेना - 10
राष्ट्रवादी -
ठाकरे गट -
काँग्रेस -
श गट -
mns -
अपक्ष - 2
09 Feb 2026 10:56 AM (IST)
शिरोळ तालुका
उदगाव जिल्हा परिषद
भाजपचे उमेदवार संदीप पुजारी हे पहिल्या फेरीअखेर आघाडीवर..
यड्राव जिल्हा परिषद
भाजपच्या उमेदवार संजना पुजारी पहिल्या फेरीअखेर आघाडीवर..
नांदणी जिल्हा परिषद
राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवार प्राचीता चंद्रकांत कोळी यांना पहिल्या फेरी अखेर आघाडीवर..
आलास जिल्हा परिषद
मतसंघातील भाजपचे उमेदवार प्रशांत शहापुरे हे पहिल्या फेरीअखेर आघाडीवर
दत्तवाड जिल्हा परिषद
राधा उर्फ दिपाली पाटील या पहिल्या फेरीअखेर १३५ मतांनी आघाडीवर आहेत.
अब्दुल लाट जिल्हा परिषद
श्रद्धा अविनाश गायकवाड या 437 मतांनी आघाडीवर आहेत.
09 Feb 2026 10:50 AM (IST)
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शनिवारी झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर आज निकालाचा दिवस उजाडला आहे. जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांतील नऊ केंद्रांवर सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, राजकीय नेत्यांसह उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
मतमोजणीच्या नियोजनानुसार, जिल्ह्याभरात एकूण २० टेबलांवर १९ फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी १० वाजता सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरू करण्यात आली असून, त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाईल. प्रशासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून दुपारी २ वाजेपर्यंत जिल्ह्याच्या सत्तेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे.
09 Feb 2026 10:46 AM (IST)
बारामती: राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेला आज सकाळी टपाल मतपत्रिकेच्या (Post Ballot) मोजणीने सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या निकालपूर्व काळात अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्याचे पडसाद आज मतमोजणीच्या ठिकाणीही उमटत आहेत. नेहमी जल्लोषात असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आज मोठी शांतता आणि संमिश्र भावना पाहायला मिळत आहेत. कोणताही मोठा गोंधळ किंवा शक्तिप्रदर्शन टाळून कार्यकर्ते निकालाच्या अपडेट्सकडे लक्ष लावून आहेत.प्रशासनाकडून बारामती येथील मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, टपाल मतमोजणीनंतर प्रत्यक्ष ईव्हीएममधील (EVM) मतांची मोजणी सुरू होणार आहे. बारामतीचा गड कोण राखणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
09 Feb 2026 10:28 AM (IST)
धाराशिव: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात होत असतानाच धाराशिव येथील मतमोजणी केंद्रावर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्राबाहेर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनामध्ये मोठा गोंधळ उडाला असून, उमेदवारांच्या प्रतिनिधींनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
मतमोजणीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या अधिकृत प्रतिनिधींना केंद्राच्या आत प्रवेश दिला जात नसल्याने हा वाद विकोपाला गेला आहे. गेल्या तासाभरापासून अनेक प्रतिनिधींना मुख्य प्रवेशद्वारावरच अडवून धरण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. "प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे आम्हाला बाहेर थांबावे लागत आहे," असा आरोप संतप्त प्रतिनिधींनी केला आहे.
09 Feb 2026 09:35 AM (IST)
पोलादपूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणांसाठी मतमोजणी प्रक्रियेला काही मिनिटातच सुरुवात होणार असून कार्यकर्त्यांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शिवसेना शिंदे गट- शेकाप युती विरुद्ध भाजपा राष्ट्रवादी आघाडी यांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळत असून रोमांचक अशा लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलें आहे
09 Feb 2026 08:58 AM (IST)
पुणे जिल्ह्यातील मिनी मंत्रालयाचा म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल आज जाहीर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी झालेल्या या मतदानानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात कोणाचे वर्चस्व राहणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
यंदा पुणे जिल्ह्यात सरासरी ६८.८९ टक्के मतदान नोंदवण्यात आले असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का काहीसा घटला आहे. विशेषतः बारामतीमधील निवडणूक राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. बारामतीमध्ये ५४.९० टक्के इतके निचांकी मतदान झाल्याने, या उदासीनतेचा फटका कोणाला बसणार आणि फायदा कोणाला होणार, यावर आता गणिते मांडली जात आहेत. मावळ, भोर, शिरूर आणि खेड यांसारख्या तालुक्यांमध्ये मात्र मतदारांनी मतदानाचा उत्साह दाखवत मोठा प्रतिसाद दिला आहे.
09 Feb 2026 08:45 AM (IST)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीचा प्रचार थंडावला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर प्रमुख नेत्यांनी प्रचारसभा घेणे टाळले होते. मात्र, असे जरी असले तरी अजित पवार हे प्रचारसभांसाठीच जात असताना हा अपघात झाल्याने भावनिक लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.
09 Feb 2026 08:44 AM (IST)
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आज फैसला होणार आहे. जिल्ह्यातील ५५ जिल्हा परिषद आणि ११० पंचायत समिती जागांसाठी आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत आहे. या निवडणुकीत राज्यातील दिग्गज राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून जिल्ह्यावर कोणाचे वर्चस्व राहणार, याचा निकाल आज स्पष्ट होईल.
या निवडणुकीच्या निमित्ताने माजी मंत्री तानाजी सावंत, भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील, शिवसेना (उबाठा) खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपा नेते बसवराज पाटील यांसारख्या बड्या नेत्यांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या २३४ उमेदवारांच्या आणि पंचायत समितीच्या २९३ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज मतमोजणीनंतर होणार आहे.
09 Feb 2026 08:40 AM (IST)
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होत असून, ग्रामीण राजकारणात कोणता पक्ष बाजी मारणार आणि कोण गुलाल उधळणार, याचा फैसला काही तासांतच स्पष्ट होईल.
लातूर जिल्ह्यात काल जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी आणि १० पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी चुरशीने मतदान पार पडले. जिल्ह्यातील ९ लाख ५१ हजार मतदारांपैकी ६४ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला असून, प्रशासनाने आजच्या मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त आणि व्यापक तयारी पूर्ण केली आहे.
09 Feb 2026 08:35 AM (IST)
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, हे बघावे लागेल. यापूर्वी झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप राज्यातील सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता.
09 Feb 2026 08:35 AM (IST)
कोकणातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. संपूर्ण कोकण पट्ट्यात महायुतीचे तब्बल २७ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने बाजी मारली आहे. ५० सदस्य संख्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महायुतीने ८ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे.
भाजपचे ७ आणि शिंदे गटाचा १ सदस्य विजयी.
एकूण १०० जागांपैकी १७ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे १६ आणि शिंदे शिवसेनेचा १ उमेदवार आहे.
09 Feb 2026 08:25 AM (IST)
ग्रामीण भागातील विकासकामे आणि निधीवाटपाच्या दृष्टीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा महत्त्वाच्या असतात. त्यामुळे याठिकाणी आता कोणाची सत्ता येणार, हे आज स्पष्ट होईल.
09 Feb 2026 08:15 AM (IST)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी सरासरी 68.28 टक्के मतदान झाले होते.
09 Feb 2026 08:06 AM (IST)
या निवडणुकीची मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. त्यानंतर साधारण चार ते पाच तासांमध्ये या निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निकालात कोणता पक्ष बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
09 Feb 2026 07:55 AM (IST)
निवडणुकीत राज्यभरातील ७४३८ उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले आहे. १२ जिल्हा परिषद क्षेत्रात सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी एकूण २६२४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीची मतमोजणी आज होणार असून, त्यानंतर आचारसंहिता उठवली जाणार आहे.
09 Feb 2026 07:50 AM (IST)
राज्यातील जिल्हा परिषदांसह पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज घेतली जाणार आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सर्वच मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.






