स्वेटल लॉजिस्टिक्स
नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि अनेक महत्वाचे नेते हे नागपूरमधून येत असल्याने नागपूरचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. दरम्यान याच नागपूरमध्ये 1971 मध्ये मुकुंदभाई वेद नावाच्या व्यक्तीने खूप मेहनतीने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. आज त्या व्यवसायाचा वटवृक्ष झाला आहे. आज लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंगच्या व्यवसायात स्वेटल लॉजिस्टिक्स ब्रँडचे मोठे नाव आहे. वर्षानुवर्षे केलेली मेहनत आणि योग्य दूरदृष्टी यामुळे त्यांचे नाव या व्यवसायात एक प्रतिष्ठेचे बनले आहे.
स्वेटल लॉजिस्टिक्स ब्रँडचा वारसा आजच्या काळात मुकुंदभाई वेद त्यांची मुले पुढे नेत आहेत. शैलेश, परेश आणि धर्मेश हे तिघे आज त्यांच्या व्यवसाय पुढे नेण्याचे काम करत आहेत. तसेच आता मुकुंदभाई वेद यांचा नातू देखील स्वेटल लॉजिस्टिक्सला नवीन उंचीवर नेण्यासाठी मेहनत घेत आहेत.
शैलेश आणि त्यांच्या कुटुंबाला या व्यवसायात त्यांचे वडील मुकुंदभाई वेद यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. स्वेटल लॉजिस्टिक्सची संपूर्ण रचना मुकुंदभाई यांची दूरदृष्टी, नीतिमत्ता आणि मूल्यांवरचा अढळ विश्वास यावर बांधली गेली आहे.
प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर
ग्राहककेंद्रित दृष्टिकोन आणि गुणवत्तेप्रती असलेल्या वचनबद्धतेमुळे, स्वेटल लॉजिस्टिक्स कंपनी आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. ही कंपनी ग्राहकांच्या गरजेनुसार, सेवा प्रदान करते. मटेरियल हँडलिंग असो, वेअरहाऊसिंग असो, वाहतूक असो किंवा कस्टमाइज्ड सप्लाय चेन सोल्यूशन्स, यामध्ये कंपनी अग्रेसर आहे. कंपनीला मिळालेली आयएसओ ९००१, १४००१ आणि ४५००१ सारखी गुणवत्ता प्रमाणपत्रे त्यांच्या कामाची ओळख दर्शवते. स्वेटल लॉजिस्टिक्स, स्टील, फार्मा, एक्स्कॅव्हेटर मशीन स्पेअर पार्ट्स, ऑटोमोटिव्ह, एफएमसीजी, अॅग्रो, फर्टिलायझर्स, कोल्ड स्टोरेज आणि पेंट्स सारख्या क्षेत्रातील कंपन्यांशी सक्रियपणे संलग्न आहे.
मेहनत आवश्यक
आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ स्मार्ट वर्क बरोबरच कठोर मेहनत गरजेची आहे. यश प्राप्तीसाठी दोन्ही गोष्टींचा समतोल राखणे आवश्यक असते, असे शैलेश वेद यांचे म्हणणे आहे. वेगळा विचार करणे, काहीतरी वेगळे करणे आणि स्वतःची वेगळी ओळख तयार करणे हे चांगले ठरते.
अनेक पुरस्काराने सन्मान
स्वेटल लॉजिस्टिक्सला आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सर्वोत्कृष्ट विक्रेता, सर्वोत्कृष्ट वेअरहाऊस, सुरक्षिततेतील उत्कृष्ट कामगिरी, शाश्वतता आणि नवोपक्रमासाठी मान्यता आणि कमी किमतीच्या पुरवठा साखळी उपायांसाठी सन्मानित करण्यात आले आहे.
विविध क्षेत्रात सहभागी
मुकुंदा इन्फ्राव्हेंचर्स निवासी आणि औद्योगिक भूखंडांचा विकास, दर्जेदार पायाभूत सुविधांचे बांधकाम, ग्राहकांच्या गरजेनुसार सानुकूलित जागेचे नियोजन, पर्यावरणीय आणि सुरक्षा मानकांचे पालन करणे अशा अनेक क्षेत्रात स्वेटल लॉजिस्टिक्स सहभागी आहे.
स्वेटल लॉजिस्टिक्सचे उद्दिष्ट केवळ नफा कमावणे इतका नसून, ही कंपनी आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण यामध्ये देखील सहभाग घेते. सीएसआर, सुरक्षा आणि हरित उपक्रम यांसारख्या क्षेत्रामध्ये स्वेटल लॉजिस्टिक्स कंपनी हिरीरीने लक्ष देत असते.