Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…

भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावे अनेक विक्रम जमा आहेत. १३ नोव्हेंबर २०१४ रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्धचे दुहेरी शतकाचा विक्रम अविस्मरणीय आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 13, 2025 | 04:18 PM
Video: Fireworks of 9 sixes including 3 fours! 11 years ago, the 'Hitman' show was played at Eden Gardens...; Watch Video

Video: Fireworks of 9 sixes including 3 fours! 11 years ago, the 'Hitman' show was played at Eden Gardens...; Watch Video

Follow Us
Close
Follow Us:
  • ११ वर्षांपूर्वी रोहित शर्माने २६४ धावांची शानदार खेळी खेळली
  • श्रीलंकेविरुद्ध कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर रोहित शर्माचे वादळी दुहेरी शतक 
  • रोहित शर्माने १७३ चेंडूत २६४ धावांची खेळी केली होती 

Rohit Sharma’s brilliance at Eden Gardens : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावे अनेक विक्रम जमा आहेत.  काहींनी त्यातीलल विक्रम मोडले तर काही अजून देखील अबाधित आहेत. त्यातील एक असा विक्रम आहे जो इतर कोणत्याही फलंदाजासाठी मोडणे कठीण ठरत आले आहे. रोहितन शर्माने एकाच एकदिवसीय सामन्यात २६४ धावांची शानदार खेळी साकारली होती. १३ नोव्हेंबर २०१४ रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. तत्कालीन कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरला होता आणि त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची लाईन अँड लेंथ बिघडवण्यात लकसलीच कसूर सोडली नव्हती.

हेही वाचा : ज्युनियर वर्ल्ड कप ट्रॉफी लखनौमध्ये दाखल! उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून स्वागत

११ वर्षांपूर्वी खेळलेली रोहित शर्माची ही संस्मरणीय खेळी बीसीसीआयकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. . ‘एक्स’ वर पोस्ट करताना बीसीसीआयने लिहिले आहे की, “११ वर्षांपूर्वी रोहित शर्माने २६४ धावांची शानदार खेळी खेळली.” बीसीसीआयने सामन्याची एक व्हिडिओ क्लिप देखील शेअर केली असून यामध्ये रोहित शर्मा श्रीलंकेच्या गोलंदाजांवर तुटून पडला आणि त्याने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली.

या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील चौथा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला गेला होता. त्यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या डावाची सुरवात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्या जोडीने केली. रहाणे आणि शर्माने संघाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु रहाणेने २४ चेंडूत २८ धावा काढून बाद झाला.

pic.twitter.com/9tb1ykHq2u Watch his full record-breaking knock ▶️ https://t.co/sHk5XprYeD https://t.co/hEEXykmSyH — BCCI (@BCCI) November 13, 2025

भारताचा स्कोअर एक बाद ४० धावा असताना अंबाती रायुडू मैदानात आला. पण तो देखील  जास्त काळ टिकू शकला नाही, १९ चेंडूत ८ धावा काढल्यानंतर तो बाद झाला. भारताचा स्कोअर दोन बाद ५९ झाला तेव्हा रोहित शर्माने क्रीजवर एका टोकाला सांभाळून होता.

 

हेही वाचा : IND vs SA Test series : ‘आम्ही इतिहास घडवू…’ केशव महाराजनंतर दक्षिण आफ्रिकेचे कोच शुक्री कॉनराड यांनी थोपटले दंड

विराट कोहली आल्यानंतर तेव्हा कोहली आणि रोहित शर्मा यांनी संघाला सावरले आणि २०० धावांची शानदार भागीदारी रचली.  विराट बाद झाला तेव्हा संघाचा स्कोअर २६१ पर्यंत जाऊन  पोहोचला होता. विराटने ६६ धावा केल्या होत्या. भारत आता सहज ३०० धावा गाठण्यास सज्ज दिसत होता, परंतु रोहित शर्माचे वादळ घोंघावू लागले. आधीच शतक झळकावल्यानंतर, रोहित शर्माने आपली फलंदाजी वेगवान केली आणि श्रीलंकेच्या गोलंदाजांना टार्गेट करत त्यांना सळो की पळो करून सोडले. रोहित शर्माने सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांच्यासोबत भागीदारी रचतभारताला ४०४ धावांपर्यंत नेऊन ठेवले. रोहित शर्माने १७३ चेंडूत २६४ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ३३ चौकार आणि ९ षटकार मारले.  प्रत्युत्तरादाखल, श्रीलंकेचा संघ २५१ धावाच करू शकला. भारताने हा सामना १५३ धावांनी जिंकला.

Web Title: 11 years ago rohit sharma scored 264 runs at eden gardens watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 04:17 PM

Topics:  

  • bcci
  • double century
  • IND vs SL
  • Rohit Sharma
  • Video Viral

संबंधित बातम्या

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर
1

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
2

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड
3

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड

अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन जोडीची क्लिप व्हायरल! न्यूयॉर्कमध्ये दिसले एकत्र; लग्नाच्या अफवांना बळ
4

अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन जोडीची क्लिप व्हायरल! न्यूयॉर्कमध्ये दिसले एकत्र; लग्नाच्या अफवांना बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.