
याबाबत अधिकृत घोषणा झाली नाहीये. मात्र या तारखांमध्ये आशिया कप स्पर्धा खेळवली जाण्याची दाट शक्यता आहे. ही स्पर्धा बांग्लादेशमध्ये होण्या शक्यता आहे. अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली, तरी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या भव्य आयोजनासाठी कंबर कसली आहे. बीसीबीने या स्पर्धेचे सामने भरवण्यासाठी एसीसीकडे तीन प्रमुख स्टेडियमचे प्रस्ताव पाठवले आहेत.
2027 मध्ये होणारी आशिया कप स्पर्धा ति 20 फॉर्मटमध्ये नव्हे तर एकदिवसीय फॉर्मटमध्ये खेळवली जाणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हा बदल खास ठरण्याची शक्यता आहे. २०२७ मध्येच दक्षिण आफ्रिकेत आयसीसी वनडे विश्वचषक होणार आहे. त्याच्या दृष्टीने आशियाई संघाची तयारी म्हणून याकडे पाहिले जात आहे.
‘बेबी बॉस’ला फॉर्मचे ‘ग्रहण’! इंग्लंडमध्ये Vaibhav Suryvanshi च्या फ्लॉप होण्याचे कारण काय?
2023 मध्ये आशिया कप भारतीय संघाने जिंकला होता. आटा 2027 मध्ये पुन्हा एकदा आशियाई क्रिकेट संघांमध्ये महामुकाबला पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये भारत, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान असे संघ खेळताना दिसणार आहेत.
बीसीबीने या स्पर्धेचे सामने भरवण्यासाठी एसीसीकडे (ACC) तीन प्रमुख स्टेडियमचे प्रस्ताव पाठवले आहेत.
१. शेर-ए-बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियम
२. जहूर अहमद चौधरी स्टेडियम
३. सिल्हेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम
या तीनही स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्याचा चांगला अनुभव बांगलादेशकडे आहे.
अन्यायाची परिसीमा? टीम इंडियामध्ये Sanju Samson साठी दरवाजे बंद? गौतम गंभीरच्या विधानाने खळबळ
आशिया कपच्या यजमानपदाच्या शर्यतीत बांग्लादेशचा संघ आघाडीवर असणार आहे. मात्र जर ही स्पर्धा बांग्लादेशमध्ये झाल्यास भारतीय संघ तिकडे खेळण्यासाठी जाणार का हे पहावे लागणार आहे. सध्या बांग्लादेश क्रिकेट बॉर्ड बीसीसीआयसोबत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. त्याला कितपत यश मिळणार हे येणाऱ्या काळातच संजू शकणार आहे.
गौतम गंभीरच्या विधानाने खळबळ
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी- २० सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. मंगळवारी (दि. ७) ट्रेंट ब्रिजवर खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला १२५ धावांनी पराभूत केले. मोठ्या फरकाने झालेल्या पराभवानंतर संजू सॅमसनला संघातून वगळण्यावरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संजू्च्या कमबॅकबाबत मोठे वक्तव्य केले आहे.