वैभव सूर्यवंशी (फोटो- ians)
वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्ध इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केले आहे. मात्र दोन सामन्यात त्याला त्याच्या फॉर्मप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. केवळ दोन सामन्यांमध्ये कोणाच्या खेळीविषयी तर्कवितर्क लगावले योग्य ठरणार नाही. मात्र आयपीएलमध्ये शानदार फॉर्ममध्ये खेळणाऱ्या वैभवची बॅट इंग्लंड दौऱ्यात चालत नसल्याच पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी आयपीएल लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली. त्याने सर्वाधिक रन्स आयपीएलमध्ये केल्या होत्या. सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. मात्र इंग्लंड दौऱ्यात त्याच्या खेळीवर फरक पडल्याचे दिसून येत आहे. आयपीएलमध्ये वैभवला फलंदाजीसाठी अनुकूल पीच मिळत असे. मात्र इंग्लंडमध्ये परिस्थिती वेगळी असल्याचे पाहायला मिळत आहे.
Archer 🆚 Sooryavanshi Jofra strikes! ☝️ Match Centre: https://t.co/ZWzBgf1rTw pic.twitter.com/Bd44HUbJZB — England Cricket (@englandcricket) July 7, 2026
इंग्लंडमध्ये पीच कसे असते?
इंग्लंडमधील पीच हे भारतातील पीचपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे असतात. येथे फलंदाजांची अग्निपरीक्षा असते. बॉल उसळून येतो आणि स्विंग मिळतो. त्यामुळे फलंदाजी करणे थोडेसे अवघड असते. सध्या इंग्लंडचे गोलंदाज वैभवला वेगळ्या प्रकारे टेस्ट करत आहेत. जो बॉल वैभवच्या स्लॉटमध्ये असतो त्याला तो थेट सीमारेषेबाहेर पाठवतो. मात्र अत्यंत वेगाने रन्स करण्याच्या नादात तो आपली विकेट गमावत आहे. सुरुवातीचे काही बॉल सावकाश खेळून पीचवर सेट झाल्यास वैभव सूर्यवंशी मोठी खेळी करण्यास यशस्वी ठरू शकतो.
लाजिरवाण्या रेकॉर्डमध्ये Shreyas Iyer अव्वल! Team India च्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नोंद
गौतम गंभीर भारतीय टीमला वाळवीसारखा पोखरतोय
नॉटिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी पुन्हा एकदा डावाची सुरुवात केली. मात्र, दोन्ही सलामीवीर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. अभिषेक शर्माने १० धावा केल्या, तर सूर्यवंशीने केवळ १३ धावा केल्या. त्यांच्या बाद झाल्यानंतर ईशान किशनही स्वस्तात बाद झाला. प्रशिक्षक गंभीर यांच्या डावखुरा-उजवा फलंदाजांच्या संयोजनाने चाहते थक्क झाले.






