
In Bangladesh, a cricket ground turned into a 'WWE arena'! Players fought the match with kicks and punches; 6 people were injured; Video goes viral.
Bangladesh Celebrity Cricket League fight viral video : क्रिकेट हा सज्जनांचा खेळ म्हणून ओळखला जातो. परंतु, खूप वेळा मैदानात अशा देखील घटना बघायला मिळतात की मैदानाचे रूपांतर थेट हाणामारी देखील झालेले दिसून येते. असाच एक प्रकार बांगलादेशमध्ये घडला आहे. बांगलादेशमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा सामना सुरू असताना या सामन्याला हिंसक वळण लागले आणि क्षणात सामना भांडणात रूपांतरित झाला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : IND vs NZ : राजकोटमध्ये भारताची आकडेवारी चिंता वाढवणारी! न्यूझीलंड ठरू शकतो वरचढ; वाचा सविस्तर
माध्यमांच्या वृत्तानुसार, बांगलादेश सेलिब्रिटी क्रिकेट लीग सुरू असताना पंचांनी चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यता आला, ज्यामुळे खेळाडूंमध्ये हाणामारी देखील झाली आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये तूफान लाथा आणि मुक्कांनी मारामारी घडून आली. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओमध्ये सर्व घटना दिसून येत आहे.
बांगलादेश सेलिब्रिटी क्रिकेट लीग सामन्यादरम्यान चेंडू स्पष्टपणे सीमा ओलांडली होती, परंतु पंचांकडून त्यावर चौकार देण्यास नकार दिला. परिणामी, सामन्याचे रूपांतर कुस्ती मैदानात झाले. परिस्थिती इतकी टोकाला जाऊन पोहचली की, एका सेलिब्रिटीला अश्रूही अनावर झाल्याचे दिसून आले.
Celebrity Cricket League has turned into WWE Royal Rumble. 😂 – 6 people got injured
– Tournament got cancelled before semis 30+ year old male & female adults fighting over boundary & out decision in a ‘friendly’ tournament. 🤣 pic.twitter.com/FOAxEI00rz — Saif Ahmed (@saifahmed75) September 30, 2023
चित्रपट निर्माते मुस्तफा कमाल राज आणि दीपंकर दीपन यांच्या गटात हा सामाना होता, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये सहा जण जखमी देखील झाले आहेत. या जखमी झालेल्या सहा जणांना रुग्णालयात दाखल केले गेले असून स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
हेही वाचा : IND vs NZ : राजकोटमध्ये श्रेयस अय्यरला इतिहास रचण्याची संधी! ‘किंग’ कोहलीला टाकणार मागे? वाचा सविस्तर
हा चित्रपट कलाकारांमधील मैत्रीपूर्ण सामना खेळला जात होता. परंतु हा सामना अचानक कुस्तीच्या मैदानात रूपांतरित झाला. या हाणामारीमध्ये कोणीही हस्तक्षेप करू इच्छित नसल्याचे दिसले. या वेळी कुणालाही वाटले नाही की परिस्थिती नियंत्रित करावी.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दूसरा एकदिवसीय सामना राजकोट येथे खेळला जाणार आहे. राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारत विजय मिळवून मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात ९३ धावांची विजयी खेळी करणाऱ्या विराट कोहलीला दुसऱ्या सामन्यात एक विक्रम खुणावत आहे. वडोदरा येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनलेल्या विराट कोहलीचे आता रिकी पॉन्टिंगला मागे टाकण्याचे उद्दिष्ट असणार आहे. ही कामगिरी साध्य करण्यासाठी त्याला ६३ धावांची आवश्यकता आहे.