फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru/KolkataKnightRiders सोशल मीडिया
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या लीग म्हणजेच आयपीएलचा नवा सिझनची आज सुरुवात होणार आहे. २२ मार्चपासून आयपीएलचा १८ वा सिझनचा आज शुभारंभ होणार आहे. आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. आजच्या या सामन्याची सुरुवात ७.३० होणार आहे. या सामान्यचे आयोजन ईडन गार्डनच्या मैदानावर करण्यात आले आहे. त्याआधी मैदानावर या नव्या सीझनचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कागदावर दोन्ही संघ खूप मजबूत दिसत आहेत. गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामन्यासाठी परफेक्ट फॅन्टॅसी संघ कोणता असू शकतो? जर तुम्हालाही या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.
कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर केकेआर आणि आरसीबी हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ या हंगामात नवीन कर्णधारांसह खेळत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व अनुभवी अजिंक्य रहाणेकडे आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तरुण रजत पाटीदारला कर्णधार बनवले आहे. आयपीएलच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर, केकेआरने आरसीबीविरुद्ध वरचढ कामगिरी केली आहे. पण ते म्हणतात की प्रत्येक दिवस नवीन असतो. हे क्रिकेटमध्ये खूप चांगले लागू होते आणि रेकॉर्ड्स फारसे महत्त्वाचे नसतात. ड्रीम११ सारख्या फॅन्टसी लीग खेळताना क्रिकेट चाहत्यांनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
फॅन्टसी लीगसाठी ड्रीम ११ निवडताना, सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे कर्णधार आणि उपकर्णधार निवडणे. कर्णधाराच्या कामगिरीमुळे नेहमीच दुहेरी गुण मिळतात हे लक्षात ठेवा. म्हणून तुमचा कर्णधार काळजीपूर्वक निवडा. उपकर्णधार निवडताना हे लक्षात ठेवा. तथापि, खेळाडू किंवा कर्णधार निवडणे हा नेहमीच वैयक्तिक आत्मविश्वासाचा विषय असतो कारण क्रिकेटमध्ये खेळाडू कधी धावा करेल किंवा विकेट घेईल हे कोणालाही माहिती नसते.
यामध्ये आजच्या सामन्यांमध्ये आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार, फिल साल्ट, विराट कोहली या तीन सलामीवीर फलंदाजांना विकत घेतले आहे. अष्टपैलूबद्दल बोलायचं झालं तर सुनील नारायण, आंद्रे रसेल, कृणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन यांना घेतले आहे. तर एक म्हणजेच मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीवर विश्वास ठेवता येईल. त्याचबरोबर आरसीबीच्या संघामध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारवर बाजी लावू शकतो. कर्णधारचं पद सुनील नरेनला करण्यात आले तर उपकर्णधार – विराट कोहलीला बनवण्यात आले आहे.
रजत पाटीदार, फिल साल्ट, विराट कोहली, रिंकू सिंग, रजत पाटीदार (३ फलंदाज), सुनील नारायण, आंद्रे रसेल, कृणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन (४ अष्टपैलू), वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (२ गोलंदाज). कर्णधार – सुनील नरेन. उपकर्णधार – विराट कोहली.