Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit – Dhoni ही राहिले मागे! पण ‘या’ भारतीय खेळाडूने फक्त 35 सामने खेळून जिंकल्या 5 IPL Trophy

IPL जिंकणे हे जगातील दिग्गज क्रिकेटपटूंचे स्वप्न असते. भारतीय क्रिकेटमध्ये एक असा खेळाडू आहे, ज्याने केवळ ३५ सामने खेळून तब्बल ५ वेळा आयपीएल चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 23, 2026 | 08:00 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • IPL जिंकणे हे जगातील दिग्गज क्रिकेटपटूंचे स्वप्न
  • एक असा खेळाडू फक्त 35 सामने खेळून ५ वेळा आयपीएल चॅम्पियन बनला
  • ऐतिहासिक षटकार आजही आठवणीत
Only 35 Matches and Won 5 IPL Trophies : IPL जिंकणे हे जगातील दिग्गज क्रिकेटपटूंचे स्वप्न असते. विराट कोहलीला पहिले जेतेपद मिळवण्यासाठी १८ सीजन वाट पाहावी लागली, तर महान सचिन तेंडुलकरला सहाव्या सीजनमध्ये पहिली ट्रॉफी मिळाली. एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलसारखे वादळ रोखणारे खेळाडू तर एकही ट्रॉफी न जिंकता निवृत्त झाले. पण, भारतीय क्रिकेटमध्ये एक असा खेळाडू आहे, ज्याने केवळ ३५ सामने खेळून तब्बल ५ वेळा आयपीएल चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला आहे.

IPL पूर्वी Mumbai Indians संघात कर्णधार पदासाठी रस्सीखेच! आता Surya च्या बाजूने ‘हा’ फिरकीपटू मैदानात

रोहित आणि रायडूसोबत स्थान

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ६-६ ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम रोहित शर्मा आणि अंबाती रायडू यांच्या नावावर आहे. त्यानंतर ५ ट्रॉफी जिंकणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये मुंबईच्या आदित्य तारेचा समावेश होतो. विशेष म्हणजे, केएल राहुल, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज यांसारखे स्टार खेळाडू १०० पेक्षा जास्त सामने खेळूनही अजूनही पहिल्या ट्रॉफीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र या खेळाडूने फक्त 35 सामन्यात ५ ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत.

४ वेळा मुंबई आणि १ वेळा हैदराबादचा चॅम्पियन संघात

विकेटकीपर फलंदाज आदित्य तारे २०१३, २०१५, २०१६, २०१९ आणि २०२० मध्ये चॅम्पियन बनलेल्या संघांचा भाग होता. तो चार वेळा मुंबई इंडियन्स कडून खेळला आणि ट्रॉफीचा हकदार ठरला. २०१६ मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग बनला आणि त्याने जेतेपद पटकावले होते. त्याच्या ३५ सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने मुंबई आणि हैदराबादव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स संघाचंही प्रतिनिधित्व केले आहे.

ऐतिहासिक षटकार आजही आठवणीत

आदित्य तारेचे नाव काढले की, २०१४ च्या आयपीएलमधील तो थरारक सामना आठवतो. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या त्या सामन्यात मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी शेवटच्या चेंडूवर सीमारेषेबाहेर फटका मारणे आवश्यक होते. आदित्य तारेने जेम्स फॉकनरच्या चेंडूवर गगनभेदी षटकार मारला आणि वानखेडे स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. तो षटकार मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात यादगार क्षणांपैकी एक मानला जातो.

घरगुती क्रिकेटमधील नावाजलेला खेळाडू

केवळ आयपीएलच नाही, तर घरगुती क्रिकेटमध्येही आदित्य तारेचे मोठे नाव आहे: त्याने मुंबईचा कर्णधार म्हणून भूमिका बजावली आहे. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व केले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०१ सामन्यांत १० शतकांच्या मदतीने ५,६०८ धावा केल्या आहेत. टी-२० कारकीर्दीत एकूण १३० टी-२० सामन्यांत त्याने २,६३० धावा फटकावल्या आहेत. मुंबईव्यतिरिक्त तो उत्तराखंड संघाकडूनही खेळला आहे. दिग्गज खेळाडू जे स्वप्न पाहतात, ते आदित्यने आपल्या छोट्याशा आयपीएल कारकिर्दीत ५ वेळा जगले आहे.

खेळ की दहशत? Pakistan Super League दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? परदेशी खेळाडूंना जीवे मारण्याची आली धमकी

Web Title: Aditya tare has played only 35 matches in the ipl and won 5 trophies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 08:00 PM

Topics:  

  • IPL
  • IPL 2026
  • Mahendra Singh Dhoni
  • Sports News
  • virat kohali

संबंधित बातम्या

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
1

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
4

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.