
भारत विरुद्ध अफगणिस्तानमध्ये खेळवला जाणार एक कसोटी सामना
शुभमन गिल करणार भारतीय संघाचे नेतृत्व
6 जून 2026 पासून सुरू होणार मालिका
IND Vs AFG: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी मालिकेसाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केले आहेत. 6 जूनपासून ही मालिका सुरू होणार आहे. यामध्ये एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. तर तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. अफगाणिस्तानचे नेतृत्व अनुभवी फलंदाज हश्मतुल्लाह शाहिदी करणार आहे. तर भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे.
अफगाणिस्तानचा महत्वाचा खेळाडू आणि लेग स्पिनर राशीद खानने भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे. मात्र एकदिवसीय मालिकेत तो खेळणार आहे. कैस अहमद, शराफुद्दीन अश्रफ हे दोन स्पिनर्स कसोटी सामन्यात खेळणार आहेत.
अफगाणिस्तानचा कसोटीचा संघ: हश्मतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अब्दुल मलिक, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, अफसर झझाई (यष्टिरक्षक), इकराम अलीखिल (यष्टिरक्षक), रहमानुल्लाह गुरबाज, रहमानुल्लाह जादरान, अझमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अश्रफ, नांग्याल खारोताई, कैस अहमद, बिलाल सामी, जिया शरीफी, सलीम सफी.
IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध BCCI ने दिली ‘या’ नवीन चेहऱ्यांना संधी, दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट
अफगाणिस्तानचा एकदिवसीय मालिकेचा संघ: हश्मतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), इब्राहिम जादरान, सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, रहमत शाह, इकराम अलीखिल (यष्टिरक्षक), मोहम्मद नबी, अझमतुल्लाह उमरजई, राशिद खान, नांग्याल खारोताई, एएम गजनफर, जिया यू रहमान शरीफी, फरीद मलिक, बिलाल सामी.
अफगाणिस्तानविरुद्ध ‘या’ नवीन चेहऱ्यांना संधी
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी आकाश दीपला दुखापतीमुळे संघात स्थान मिळू शकले नाही, तर रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर, एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी हर्षित राणा, ऋषभ पंत, आयुष बडोनी यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज सारख्या दिग्गजांना संघातून वगळण्यात आले आहे.
IND vs AFG: नवा कर्णधार, नवा जोश! अफगाणिस्तानविरुद्ध बीसीसीआयने केली Team India ची घोषणा
दुखापतग्रस्त असल्याने हर्षित राणाला संघात स्थान मिळाले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद सिराज आणि ऋषभ पंत यांना त्यांच्या कामगिरीमुळे संघातून वगळण्यात आले आहे. टीम मॅनेजमेंटला रवींद्र जडेच्याच्या ऐवजी नवीन पर्याय आजमावून पाहायचे आहे म्हणून त्यालाही विश्रांती देण्यात आली आहे. भारताने शेवटची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळली होती.