भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतचा (Rishabh Pant Accident) शुक्रवारी सकाळी अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी कारचा चक्काचूर झाला. ऋषभ कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी ऋषभच्या कारमध्ये सुमारे तीन ते चार लाख रुपये होते. अपघातानंतर सर्व रक्कम रस्त्यावर विखुरली होती. मात्र, तेव्हा रस्त्यावरील लोक मदत ऋषभला मदत करण्याऐवजी खिशात नोटा भरण्यात आणि व्हिडिओ बनवण्यात मग्न झाले होते.
[read_also content=”श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 क्रिकेट संघात निवड न झाल्याने घरी परतत होता ऋषभ पंत, धुक्कामुळे रेलिंग न दिसल्याने झाला कारचा अपघात https://www.navarashtra.com/sports/rishabh-pant-car-accident-happened-because-the-guardrail-was-not-visible-due-to-the-fog-nrps-357992.html”]
अत्यंत संताप आणणारी ही घटना आहे. आज सकाळी ऋषभ पंतचा दिल्ली वरुन घरी जाताना रुरकी येथे कार दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. पंतची प्लास्टिक सर्जरी होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.
ऋषभ पंतच्या कारमध्ये सुमारे तीन ते चार लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर गाडी दूरवर फेकल्या गेल्याने कारमधून पैसे रस्त्यावर पडले. रस्त्यावरील लोकं मात्र, ऋषभकडे जाण्याच सोडून पैसे गोळा करु लागले. त्याचवेळी गर्दीतून दोन तरुण बनून पुढे आले. ऋषभ पंतला रुरकीच्या सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी दोन तरुणही तेथे होते. यातील एक तरुण पुरकाजीजवळील शकरपूर गावचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या लिबरहेरी येथील उत्तम साखर कारखान्यात काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे.