बांग्लादेशमध्ये आरोपींना मृत्यूदंड (फोटो- istockphoto)
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने दिला निर्णय
शेख हसिना यांच्या काळात झालेल्या हिंसेबाबत
आशुलियामध्ये जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घडलेला प्रकार
बांग्लादेशमध्ये शेख हसीना पंतप्रधान असताना मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. या हिंसाचारामुळे शेख हसीना यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते.दरम्यान त्या बांग्लादेशमधील हिंसाचारादरम्यान झालेल्या एका संवेदनशील घटनेवर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने एक मोठा निर्णय दिला आहे.
5 फेब्रुवारी 2026 कोर्टाने माजी खासदार मुहम्मद सैफुल इस्लाम आणि दोन माजी अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि अन्य 6 जणांना कोर्टाने मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण 2024 जुलै ऑगस्टमधील आहे. आशुलियामध्ये मानवतेला काळिमा फसणारे एक कृत्य झाले होते. त्यावर आज कोर्टाने निर्णय दिला आहे.
बांग्लादेशमध्ये जेव्हा हिंसाचार घडत होता, तेव्हा ढाका येथील आशुलिया या भागात पोलिसांनी 6 आंदोलनकर्त्यांना गोली मारली होती. त्यानंतर क्रूरतेची हद्द पार करून पोलिसानी त्यांचे मृतदेह गाडीवर लादले होते. त्या मृतदेहांना घाणेरड्या कपड्यांमध्ये गुंडाळून जाळले गेले होते. पोलिस मृतदेह गाडीवर टाकत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
तपास करताना त्यातील एक व्यक्ती जिवंत असल्याचे समोर आले. त्या जिवंत व्यक्तीचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेत माजी खासदार आणि माजी अतिरिक्त पोलिस आधीक्षकांना तीन सदस्यीय बेंचने शिक्षा सुनावली आहे. 11 सप्टेंबर 2024 रोजी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती.
युनूस सरकारमधील मंत्री देश सोडण्याच्या तयारीत?
बांगलादेशात सध्या मोठी राजकीय उलाथापलथ सुरु आहे. येत्या १२ फेब्रुवारीला बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. परंतु यापूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये मोठा गोंधळ सुरु आबे. दावा केला जात आहे की अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी, सल्लाहार देश सोडण्याचा विचार करत आहेत. यासाठी एक सेफ एक्झिट प्लॅनची तयारीही करण्यात आली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, युनूस यांच्या मंत्रीमंडळातील नेत्यांनी यासाठी एक सेफ एक्झिट प्लॅनही तयार केला आहे. दावा केला जात आहे की सर्व मंत्र्यांनी राजनैतिक पासपोर्ट बदलून सामान्य पासपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. सहसा कोणत्याही देशातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी आपले पद सोडल्यानंतर राजकीय पासपोर्ट परत करतात. परंतु सध्या बांगलादेशात परिस्थिती उलट दिसून येते आहे. सर्व मंत्री अधिकारी राजनैतिक पासपोर्ट जमा करुन सामान्य व्हिसावर परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहे.






