Bangladesh Elections : निवडणुकीपूर्वी बांगलादेशात मोठी राजकीय उलथा-पालथ; युनूस सरकारमधील मंत्री देश सोडण्याच्या तयारीत? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बांगलादेशात लोकशाहीचा अंत? आगामी निवडणुकींचा निकाल आधीच ठरलाय…; हसीना यांच्या मुलाच्या दाव्याने खळबळ
मिडिया रिपोर्टनुसार, युनूस यांच्या मंत्रीमंडळातील नेत्यांनी यासाठी एक सेफ एक्झिट प्लॅनही तयार केला आहे. दावा केला जात आहे की सर्व मंत्र्यांनी राजनैतिक पासपोर्ट बदलून सामान्य पासपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. सहसा कोणत्याही देशातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी आपले पद सोडल्यानंतर राजकीय पासपोर्ट परत करतात. परंतु सध्या बांगलादेशात परिस्थिती उलट दिसून येते आहे. सर्व मंत्री अधिकारी राजनैतिक पासपोर्ट जमा करुन सामान्य व्हिसावर परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या निवडणुका १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहेत. परंतु यापूर्वीच निवडणुकीचा निकाल ठरला अशून अनेक चाचण्यांमध्ये बांग्लादेश नॅशनल पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांच्या पाठिने जनमत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बीएनबीचा विजय झाल्यास युनूस सरकारमधील नेत्यांवर गंभीर कारवाई केली जाऊ शकते असे म्हटले जात आहे. याच भितीपोटी मंत्रीमंडळातील वरिष्ठ नेते, अधिकारी, सल्लागार सुरक्षित निर्गमनाचा मार्ग वापरत आहेत.
ही माहिती समोर येण्याच्या एक दिवस आधीच शेख हसीना (Sheikh Hasina) यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांनी एक गंभीर दावा केला होता. डॉय यांच्या मते १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संसदीय निवडणुकांचा निकाल आधीच निश्चित करण्यात आला आहे. निवडणुक प्रक्रिया केवळ एक दिखावा असून याची सर्व सुत्रे जमात-ए-इस्लामीच्या हाती आहेत. जॉय यांनी बांग्लादेश नॅशनल पार्टी (BNP) ला इशारा दिला आहे की, निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा विजय झाला तरी सर्व प्रक्रिया ही जमात-ए-इस्लामीच्या नियंत्रणाखाली असणार आहे.
Ans: बांगलादेशात येत्या १२ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. परंतु या निवडणुकांचा निकाल हा BNP पक्षाच्या बाजूने लागणार असल्याची शक्यता आहे. BNP पक्षाचा विजय अंतरिम सरकारमधील अधिकाऱ्यांसाठी, नेत्यांसाीठी धोकादायक ठरू शकतो. यामुळे युनूस सरकारमधील राजकीय पासपोर्ट परत करुन सामान्य व्हिसा पासपोर्ट घेऊन देश सोडण्याच्या तयारीत आहेत.
Ans: १२ फेब्रुवारी २०२६ रोजी बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत.






