फोटो सौजन्य - ANI
पॅरिसमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची पंतप्रधानांनी घेतली भेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून भारतीयांना संबोधले आहे. काही दिवसांपूर्वीच पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा समारोप समारंभ पार पडला. या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने ६ पदकांची कमाई केली. पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर त्याचबरोबर फोन करून त्यांचे अभिनंदन केले होते. आज भारतीयांसाठी खास दिन आहे. या दिनी पंतप्रधानांनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत विशेष संवाद सुद्धा साधला आहे.
खेळाडूंनी भेट घेतल्यानंतर हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने आपली जर्सी पीएम मोदींना दिली. तर नेमबाज मनू भाकरने पंतप्रधानांना पिस्तूल दिले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने उपांत्य फेरीत स्पेनचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. तर भारताची नेमबाज मनू भाकर हिनेही दोन कांस्यपदक पटकावले. मात्र, या पदकविजेत्यांव्यतिरिक्त पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या अन्य खेळाडूंनी पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी लक्ष्य सेन, सरबज्योत सिंग, मनू भाकर आणि स्वप्नील कुसाळे या खेळाडूंशी चर्चा केली.
#WATCH | PM Narendra Modi meets the Indian contingent that participated in #ParisOlympics2024, at his residence. pic.twitter.com/XEIs5tHrrI
— ANI (@ANI) August 15, 2024
भारताने यंदा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहा पदकांची कमाई केली आहे. यामध्ये मनु भाकरने भारताला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पहिले पदक मिळवून दिले आहे. त्यानंतर मनु भाकर आणि सरबजोत सिंह यांनी पहिल्यांदा १० मीटर एअर शूटिंग मिक्स टीम मध्ये भारताला दुसरे कांस्यपदक मिळवून दिले. स्वप्नील कुसाळेने भारतला तिसरे पदक देऊन इतिहास रचला. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकले. त्यानंतर भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा ॲथलेटिक्समध्ये सिल्वर मेडल मिळवून इतिहास घडवला. भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावतने भारताला सहावे पदक मिळवून दिले.