फोटो सौजन्य - ICC
आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचे आयोजन ओमान येथे 1 ऑक्टोंबर ते 17 ऑक्टोबर 2025 यादरम्यान करण्यात येणार आहे. त्याआधी सध्या महिला टी-20 विश्वचषक क्वालिफायर सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आजचा सामना युएई विरुद्ध कतार यांच्यामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात युएई महिला संघाने पहिले नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचे निर्णय घेतला होता. युएईच्या संघाने नॉनव्हेज जिंकून पहिले फलंदाजी करण्याचे निर्णय घेतला होता यामध्ये त्यांनी 16 षटकांमध्ये 192 धावा केल्या होत्या. यामध्ये कतारचा संघ 11.1 ओव्हरमध्ये फक्त 29 धावा करू शकला आणि त्यानंतर संघाने हार मानले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सामन्यात एक मजेशीर आणि आश्चर्यकारक घटना घडली या संदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
शनिवारी संयुक्त अरब अमिराती आणि कतार यांच्यात महिला टी-20 विश्वचषक आशिया पात्रता 2025 सामना खेळवण्यात आला. बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या कतारविरुद्धच्या सामन्यात युएईने आपला संपूर्ण संघ निवृत्त केला. खेळाडूंचे स्वतः निवृत्त होण्याचे कारण हवामान खराब असल्याचे सांगितले जात आहे. प्रथम फलंदाजी करताना युएईने चांगली सुरुवात केली. सलामीवीर तीर्थ सतीश आणि कर्णधार ईशा रोहित ओझा यांनी १६ षटकांत पहिल्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर, खराब हवामान लक्षात घेता, संघाने एक विचित्र निर्णय घेतला आणि सर्व १० खेळाडू निवृत्त झाले आणि पॅव्हेलियनमध्ये परतले.
A unique tactic from UAE at the Women’s #T20WorldCup Asia Qualifier with 10 batters ‘Retired Out’ in a massive 163-run victory 😲
Check how it all transpired 👇https://t.co/mA95gYToQE
— ICC (@ICC) May 10, 2025
पावसाच्या धोक्यामुळे संयुक्त अरब अमिरातीने संपूर्ण संघ निवृत्त केला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात डाव घोषित करण्याचा पर्याय नसतो, त्यामुळे सर्व फलंदाज पॅड घालून खेळत असत आणि क्रीजवर पोहोचल्यानंतर स्वतःला निवृत्त करत असत. मात्र, हे सर्व करूनही कतार संघाला 11.1 षटकांत फक्त 29 धावा करता आल्या. युएई संघाने हा सामना 163 धावांनी जिंकला. कर्णधार इशानने 55 चेंडूत 14 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या. सतीशने 42 चेंडूत 74 धावा केल्या. त्याने त्याच्या डावात 11 चौकार मारले.
Virat Kohli Retirement : ब्रायन लाराच्या पोस्टने उडवली खळबळ! म्हणाला – टेस्ट क्रिकेटला विराटची…
आजच्या सामनामध्ये ईशानने कमालीची कामगिरी केली तिने एका ओव्हरमध्ये एक धाव देऊन एक विकेटही नावावर केली. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. डावखुरी फिरकी गोलंदाज मिचेल बोथाने 4 षटकांत 11 धावा देत तीन बळी घेतले. केटी थॉम्पसनने दोन, तर ईशा, हीना होतचंदानी, इंदुजा नंदकुमार आणि वैष्णव महेश यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
युएई विरुद्ध कतार या सामन्यानंतर युएईचा संघ गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. युएई च्या संघाने आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत या चार गुणांचे होते अव्वल स्थानावर विराजमान आहेत. युएईच्या संघाने याआधी मलेशियाला नऊ विकेटने पराभूत केले होते दुबईचा पुढील सामना तेरा मे रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना बँकॉक मधील आज झालेल्या मैदानावरच होणार आहे.