फोटो सौजन्य - X
ब्रायन लारा पोस्ट : भारताचा संघ आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. यावेळी टीम इंडिया कसोटी मालिका आणि t20 मालिका खेळणार असल्याची माहिती आहे. परंतु अजूनपर्यंत या संदर्भात बीसीसीआयने संघाची घोषणा केलेली नाही. त्याआधीच भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांना कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्याचा धक्का सर्वांनाच बसला. त्यानंतर वृत्तांच्या माहितीनुसार असं सांगण्यात येत होते की विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याच्या इराद्यात आहे.
सोशल मीडियावर अनेक वृत्तसमोर आले आहेत की विराट कोहलीने बीसीसीआय कडे निवृत्तीची घोषणा केली आहे परंतु अजून पर्यंत त्याला बीसीसीआयने या संदर्भात विचार करण्यासाठी संधी दिली आहे. आता क्रिकेट विश्वातले दिग्गज त्रिनिदादीय देशातले क्रिकेटपटू ब्रायन लारा यांनी सोशल मीडियावर आता एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्यांनी त्यांच्या पोस्टने सर्वांना चकित केले आहे.
सोशल मीडियावर ब्रायन लारा यांनी विराट कोहली सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यानंतर त्याने लिहीले आहे की, कसोटी क्रिकेटला विराटची गरज आहे! त्याला खात्री पटवून दिली जाईल. तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही. @virat.kohli त्याच्या उर्वरित कसोटी कारकिर्दीत सरासरी ६० पेक्षा जास्त धावा करेल. असे त्याने लिहीले आहे.
विराट कोहली इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये सामील होणार की नाही या संदर्भात अजून कोणतीही माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. आयपीएलमधील विराट कोहलीच्या कामगिरीवर नजर टाकली तर सध्या तो कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएल 2025 चे 11 सामने खेळले आहेत यामध्ये त्याने 505 धावा केल्या आहेत. यामध्ये सात अर्धशतकांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर यामध्ये 44 चौकार आणि 18 षटकार देखील त्याने मारले आहेत. विराट कोहलीने या 18 व्या सीझनमध्ये 143 चा स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे अजून तीन सामने शिल्लक आहेत. यामध्ये ते लखनऊ सुपर जॉइंट्स, सनराइजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या विरुद्ध यांचा सामने होणार आहेत. बेंगलोरचा संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये दुसरा स्थानावर आहे. संघाने आत्तापर्यंत 11 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना 8 सामन्यात विजय मिळाला आहे तर तीन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.