अनाया बांगर(फोटो-सोशल मीडिया)
Anaya Bangar will be seen in the Bigg Boss 19 house : सलमान खानचा प्रसिद्ध शो बिग बॉस सीजन १९ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २४ ऑगस्ट २०२५ पासून या सीजनला सुरवात होणार आहे. बिग बॉसच्या सिजनला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो. बॉलिवूड अभिनेता सलमान खान मागील कित्येक वर्षांपासून या शोला होस्ट करत आहे. त्यामुळे सलमान खानचे चाहते देखील हा शो आवर्जून बघत असतात. बिग बॉसच्या घरात मोठी धमाल बघायला मिळते. उल्लेखनीय बाब म्हणजे मागील काही सीजन बिग बॉसची चांगलीच क्रेज वाढली आहे. अखेर आता बिग बॉस १९ या सिजनमध्ये कोण सहभागी होणार हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे. अशातच आता माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर सीजन १९ मध्ये भाग घेणार आहे.
बिग बॉस १८ चा सीजन खूप धामकेदार राहिला होता. अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री या शोमध्ये भाग घेतला होता. अशातच भारताचे माजी क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी अनया बांगर काही सद्या खूप चर्चेत आहे. युनायटेड किंग्डमध्ये तिने हार्मोन ट्रान्सप्लांट करून घेतले आहे. आत ती मे देशी परतली आहे. अनाया पूर्वी आर्यन बांगर म्हणजे ती मुलगा होती आता मात्र तिने जेंडर चेंज ऑपरेशन केले आहे. आत ती मुलगी बनली आहे.
हेही वाचा :IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक
अनाया बांगर ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. तिने काही दिवसांपूर्वीच एक विधान केले होते. जे खूप गाजले. ती म्हणाली होती. मी ज्यावेळी आर्यनमधून अनाया झाले, त्यावेळी मला भारताच्या अनेक क्रिकेटरने त्यांच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी ऑफर केली होती. हेच नाही तर त्यांनी मला त्यांचे न्यूड फोटो देखील पाठवले. मुलानंतर मुलगी झाल्यानंतर आपल्याला कशा कशा गोष्टींचा सामना करावा लागला? याबाबत अनायाने सांगितले. आता हीच अनाया बांगर बिग बॉसच्या १९ च्या घरात दिसणार असल्याची माहिती मिळत आहे.
अनाया बिग बॉसच्या घरात येऊन काय खळबळ उडवून देणार? याकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे. अनाया बांगरला बिग बॉस सीजन 19 ची ऑफर आल्याची माहिती मिळत आहे. आता बिग बॉसच्या घरात येऊन अनाया बांगर ही काय काय खुलासे करणार? हे बघणं रंजक असणार आहे. अनाया ही एक क्रिकेटर आहे.
हेही वाचा : Photo : मुथय्या मुरलीधरनने गौतम गंभीरपेक्षा जास्त मारले आहेत षटकार, पहा ही 5 आश्चर्यकारक नावे