गौतम गंभीर हे भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी २ विश्वचषक जिंकले आहेत. त्यांनी सर्व फॉरमॅटमध्ये १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत, परंतु षटकार मारण्याच्या बाबतीत ते खूपच मागे आहेत. आज आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गंभीरपेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या ५ गोलंदाजांची नावे सांगणार आहोत.
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने त्याच्या कारकिर्दीत कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० असे एकूण २४२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने ३८.९५ च्या सरासरीने १०३२४ धावा केल्या. तथापि, तो त्याच्या कारकिर्दीत फक्त ३७ षटकार मारू शकला. त्याने एकदिवसीय सामन्यात १७ आणि कसोटी आणि टी-२० मध्ये प्रत्येकी १० षटकार मारले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २६५ सामने खेळले आणि ४५ षटकार मारले. त्याने कसोटीत ३६ आणि एकदिवसीय सामन्यात ९ षटकार मारले. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये गोलंदाजीत अनेक रेकाॅर्ड नावावर केले आहेत त्याचबरोबर त्याने फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
या यादीत श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचे नाव खूपच आश्चर्यकारक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 0 वर बाद होण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे, तरीही त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण 41 षटकार मारले. मुरलीधरनने श्रीलंकेसाठी एकूण 495 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
या यादीत न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टचे नावही आहे. त्याने २५३ सामन्यांमध्ये ३९ षटकार मारले आहेत. त्याने कसोटीत ३०, एकदिवसीय सामन्यात ७ आणि टी-२० मध्ये २ षटकार मारले आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्ननेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीरपेक्षा जास्त षटकार मारले आहेत. वॉर्नने ३३९ सामन्यांमध्ये ५० षटकार मारले आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुलचेही नाव या यादीत आहे. गुलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत खेळलेल्या २३७ सामन्यांमध्ये ४४ षटकार मारले आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया