Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : सुर्लीच्या लेकीची आंतरराष्ट्रीय झेप! अंजली वेताळने आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पटकावले कांस्यपदक

थायलंड येथे झालेल्या १५ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील सुर्ली गावच्या अंजली संतोष वेताळ हिने ६२ किलो वजनगटात कांस्यपदक जिंकून भारतासह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. दुखापतीवर मात करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात पदक मिळवणाऱ्या अंजलीच्या या यशामुळे गावात जल्लोषाचे वातावरण आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 29, 2026 | 11:51 AM
सुर्लीच्या लेकीची आंतरराष्ट्रीय झेप! अंजली वेताळने आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पटकावले कांस्यपदक

सुर्लीच्या लेकीची आंतरराष्ट्रीय झेप! अंजली वेताळने आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पटकावले कांस्यपदक

Follow Us
Follow Us:
  • आशियाई कुस्ती स्पर्धेत अंजलीने कांस्यपदक पटकावले
  • थायलंड मध्ये दमदार कामगिरी
  • लेकीच्या कामगिरीने सुर्लीत जल्लोष
औंध : थायलंड येथे झालेल्या १५ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुर्लीची वाघीण अंजली संतोष वेताळ हिने जिगरबाज कामगिरीचे प्रदर्शन करीत कांस्यपदक मिळवून आंतरराष्ट्रीय पातळीवर सुर्लीचा झेंडा फडकावला. लेकीच्या दमदार कामगिरीमुळे ग्रामस्थांनी जल्लोष केला.

६२ किलो वजनगटात कांस्यपदकासाठी भारताची अंजली वेताळ आणि मंगोलियाच्या खोन्झोरुल ओचीर यांच्यात अटीतटीची लढत झाली. अंजलीने बलाढ्य प्रतिस्पर्धी खोन्झोरुलला सुरवातीपासून डोईजड होऊ दिले नाही. सलामीपासून आक्रमक खेळ करीत तीने गुणफलक हलता ठेवून मोठी आघाडी घेतली होती. चुरशीची लढत १५ विरूद्ध २ गुण मिळवून तांत्रिक गुणाधिक्याने जिंकली.आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून तीने सातासमुद्रापार झेंडा फडकला.

IND vs ENG: इंग्रजांना केले चारी मुंड्या चीत! भारताने मारली बाजी, शूट-आऊटमध्ये Hockey Team ने झेंडा फडकवला

आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीची पहिलीच स्पर्धा होती. त्यामुळे तीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अंजली हिंदकेसरी संतोषआबा वेताळ यांची कन्या आहे.दोन वर्षे दुखापतीमुळे ती कुस्ती पासून दूर होती. जिद्द, मेहनतीने दुखापतीवर मात करताना तीने राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत बाजी मारली होती. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पदक मिळवून अंजलीने यशस्वी पुनरागमन केले आहे. ग्रामीण भागातून पुढे आलेल्या अंजलीने आशियाई स्पर्धेत पदक जिंकत सुर्ली गावासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. ती सध्या मुरगुड जिल्हा कोल्हापूर येथे लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुलात प्रशिक्षक दादासाहेब लवटे, दयानंद खतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तिच्या यशाबद्दल माजी खासदार संजय दादा मंडलिक, कार्याध्यक्ष ऍड. विरेंद्र भैय्या मंडलिक ‘साई’चे माजी राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण, हिंदकेसरी संतोषआबा वेताळ, सुर्ली ग्रामस्थांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे .

भविष्यात अंजली कडून मोठ्या अपेक्षा

“दोन वर्षे दुखापतीमुळे अंजली कुस्तीपासून दूर होती. मात्र जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तिने जोरदार पुनरागमन केले आहे. पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकून अंजलीने आपण ‘लंबी रेस का घोडा’ असल्याचे सिद्ध केले आहे. अनुभव कमी असतानाही तिने केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. भविष्यात तिच्याकडून आणखी मोठ्या अपेक्षा आहेत,”अशी माहिती प्रशिक्षक दादासाहेब लवटे यांनी दिली.

मुरगुड कुस्ती संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा

मुरगुड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुलात सराव करणाऱ्या अंजली वेताळ हिने १५ वर्षांखालील गटात आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावून इतिहास घडवला आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिल्याच स्पर्धेत कुस्ती केंद्राला पदक मिळवून देत तीने आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे.

IND vs IRE: भारतीय संघाने घालवली लाज, आयर्लंडने रचला इतिहास; 3 दिवसात 2 पराभव

Web Title: Anjali vetal wins bronze medal asian under 15 wrestling championship thailand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • maharashtra
  • Sangli
  • Sports

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर
1

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
2

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…
3

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…

Mira Bhayandar News: ‘न्यायालयापेक्षा आमदाराचा आदेश मोठा आहे का?’ उच्च न्यायालयाचा MBMC आयुक्तांना सवाल
4

Mira Bhayandar News: ‘न्यायालयापेक्षा आमदाराचा आदेश मोठा आहे का?’ उच्च न्यायालयाचा MBMC आयुक्तांना सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.