मुंबई : आशिया चषकात (Asia Cup) भारतीय संघातील खेळाडूंनी दिलासादायक कामगिरी न केल्यामुळे भारताला आशिया चषकाचा फायनल सामना गाठणे देखील शक्य झाले नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान संघ या स्पर्धेत दुसऱ्यांदा आमने समाने आला असताना भारतीय संघातील गोलंदाज अर्शदिप सिंघने (Arshdip Singh) खराब क्षेत्ररक्षण केल्यामुळे अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर अर्शदीप याला सोशल मीडियावरून फार ट्रोल करण्यात आले होते.
एवढच नाही तर काही संतप्त चाहत्यांनी त्याला गद्दार, खलिस्तानी म्हणून देखील संबोधित करण्यात आले होते. मात्र असे असूनही अर्शदीपच्या गोलंदाजीवर विश्वास ठेऊन त्याची विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर अर्शदीपच्या आई वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अर्शदीप सिंगची टी२० विश्व चषकासाठी निवड झाल्याने त्यांच्या आईवडिलांना अधिक आनंद झाला आहे. त्याचबरोबर टी २० विश्वचषकासाठी खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. ‘आमच्या मुलाची निवड झाल्याने आम्ही अत्यंत खूश आहोत. टीम इंडिया विश्वचषक जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे असे अर्शदीपच्या आईवडिलांनी सांगितलं.’ ‘ज्यावेळी १९ वर्षीय टीम इंडियाने टी २० विश्व चषक जिंकला होता. त्यावेळी त्या टीममध्ये अर्शदीप सिंग सुद्धा होता. आता होणाऱ्या विश्वचषकाच्या टीममध्ये (World Cup ) सुद्धा त्याचा समावेश आहे. सध्या तो मुख्य टीमचा एकभाग असल्याचे पाहून आम्हाला खूप आनंद होतो;. अशी प्रतिक्रिया अर्शदीपच्या पालकांनी व्यक्त केली.
विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.
राखीव खेळाडू – मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर