मिचेल स्टार्क(फोटो-सोशल मीडिया)
Mitchell Starc created history : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेला सुरुवात झाली आहे. पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सर्वबाद १७२ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने या सामन्यात इंग्लंडच्या संघाचा चांगलाच धुव्वा उडवला. त्याने या सामन्यात ७ गडी बाद करून सर्वांचे लक्ष वेधले. त्याने पहिल्याच षटकात झॅक क्रॉलीला बाद करून मोठा धक्का दिला. यासह, तो पदार्पणानंतर त्याच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
मिचेल स्टार्कने पदार्पणानंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. स्टार्कने पदार्पणानंतर त्याच्या पहिल्याच षटकात २४ विकेट्स घेतल्या आहेत. जेम्स अँडरसनने स्टार्कच्या पदार्पणानंतर त्याच्या पहिल्याच षटकात १९ विकेट्स काढल्या आहेत. तथापि, तो आता क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
स्टार्कने इंग्लंडला शून्य धावांवर पहिला धक्का दिला. डावाच्या सहाव्या चेंडूवर झॅक क्रॉली बाद झाला. मिचेल स्टार्कने क्रॉलीला उस्मान ख्वाजाने झेलबाद केले. २०१०/११ नंतर इंग्लंडची ही सर्वात वाईट सलामी भागीदारी होती. ऑस्ट्रेलियात आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक धावसंख्या २८ होती, जी २०१३-१४ मध्ये ब्रिस्बेनमध्ये कुक आणि स्टोनमन यांच्यात रचली गेली होती.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून अॅशेस मालिकेचा पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जात आहे. तथापि, या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात एक नकोसा विक्रम रचला गेला आहे. अॅशेस कसोटीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच, दोन्ही संघांकडून सामन्याच्या पहिल्या डावात शून्य सलामीची भागीदारी रचण्यात आली आहे. १४३ कसोटींच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आली आहे जेव्हा दोन्ही संघांचे सलामीचे फलंदाज पहिल्याच षटकात भोपळा न फोडता माघारी परतले.






