सलमान अली आगा आणि मोहम्मद वसीम(फोटो-सोशल मीडिया)
आजच्या सामन्यात पाकिस्तान आणि युएई दोघेही कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. या सामन्यात जर यूएई संघाने पाकिस्तानला पराभूत केले तर मोठा इतिहास लिहिला जाईल. आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानने ओमानवर जोरदार विजय मिळवून आपल्या मोहिमेची विजयी सुरवात केली होती. परंतु, या सामन्यात पाकिस्तान संघ ओमानच्या गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करताना दिसून आला होता. तसेच भारताकडून देखील पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आहे. भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात पाकिस्तान संघाला १५० धावा देखील करता आल्या नव्हत्या. संघ १२७ धावाच करू शकला होता. त्यामुळे आता पाकिस्तान संघ यूएईविरुद्ध चांगले प्रदर्शन करून स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा : INDW vs AUSW : स्मृती मानधनाचा आणखी एक भीम पराक्रम! ‘या’ एकदिवसीय विक्रमाने जगाला केले चकित
पाकिस्तान विरुद्ध यूएई, आशिया कप २०२५ चा १० वा सामना आज बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री भारतीय वेळेनुसार ८:०० वाजता खेळण्यास सुरवात होणार आहे. आजचा सामना अबू धाबी येथील यूएई येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाईल. भारतात पाकिस्तान विरुद्ध यूएई यांच्यातील सामना सोनी लिव्ह अॅपवर भारतात ऑनलाइन पाहू शकता.
यूएई संघ : मोहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), आसिफ खान, मोहम्मद जोहैब, हर्षित कौशिक, मोहम्मद फारूख, मोहम्मद जवादुल्ला, सगीर खान, हैदर अली, जुनैद सिद्दीकी, मोहम्मद रोहिद खान, आर्यन शर्मा, ध्रुव पराशर, मतिरान सिंह, मतिरान खान, ध्रुव पराशर.
पाकिस्तान संघ : साहिबजादा फरहान, सैम अयुब, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद, मोहम्मद वसीम ज्युनियर, हसन अली, हुसेन तलत, खुशदील शाह, सलमान मिर्झा, सुलेम मिर्झा.






