भारताच्या खेळाडूंची हाँगकाँग ओपन स्पर्धेत दमदार कामगिरी(फोटो-सोशल मीडिया)
Hong Kong Open Badminton Tournament : भारताच्या खेळाडूंनी हाँगकाँग ओपन स्पर्धेत आपला डंका वाजवला आहे. भारतीय खेळाडू लक्ष्य सेनसह सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या स्टार पुरुष जोडीने शनिवारी सरळ गेममध्ये विजय मिळवत हाँगकाँग ओपन सुपर ५०० च्या अंतिम फेरीत पदिमाखात प्रवेश केला आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : तो शाहिद आफ्रिदी, विष ओकणारच! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी ‘हा’ Video पाहून तुमचे रक्त खवळेल
२०२१ वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता २३ वर्षीय लक्ष्यने जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन चेनला २३-२१, २२-२० असे पराभूत केले. लक्ष्य सेनने शेवटचा जुलै २०२३ मध्ये कॅनडा ओपन सुपर ५०० स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीमध्ये सध्या २० व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्यचा सामाना चीनच्या दुसऱ्या मानांकित ली शी फेंगशी होणार आहे.
जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकाच्या सात्विक आणि चिराग या जोडीने चिनी तैपेईच्या बिंग-वेई लिन आणि चेन चेंग कुआन यांचा २१-१७, २१-१५ असा दणदणीत पराभव केला. या विजयासह या भारतीय जोडीने या हंगामात सहा उपांत्य सामने गमावल्यानंतर पहिल्यांदा अंतिम सामना गाठला आहे. आता अंतिम सामन्यात आठव्या मानांकित भारतीय जोडीचा सामना चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग आणि चिनी तैपेईच्या फांग-चिह ली आणि फांग-जेन ली यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीत विजय मिळवणाऱ्या विजय मिळवणाऱ्या जोडीशी होणार आहे.
पहिल्या गेममध्ये दोन्ही जोड्या ३-३ आणि ६-६ अशा बरोबरीत राहिल्या होत्या. पण सात्विकच्या स्मॅश आणि चिरागच्या जलद ‘इंटरसेप्शन’मुळे या भारतीय जोडीने ११-८ अशी आघाडी मिळवली होती. यानंतर तैवानच्या जोडीकडून चांगले पुनरागमन करण्यात आले आणि स्कोअर १२-१२ असा बरोबरीत आणला. मात्र तरी देखील भारतीय जोडीने १५-१२ अशी आघाडी मिळवली. चिरागच्या जलद पुनरागमनामुळे भारतीय जोडीने दुसऱ्या गेम पॉइंटवर गेम जिंकला. पुढच्या गेममध्ये चेन आणि लिन यांनी चांगली सुरुवात केली आणि ४-२ अशी आघाडी मिळवण्यात यश मिळवले परंतु भारताने ६-६ अशी बरोबरी साधून कमाल केली.
हेही वाचा : SA vs ENG T20 : फिल साल्टने स्वतःच्याच विक्रमाला दिला तडा! इंग्लंडकडून T20 cricket मध्ये पहिल्यांदाच गाजवला ‘हा’ पराक्रम
चिरागच्या काही चुकां भारताला भोवल्या. त्यामुळे तैवानच्या जोडीकडून १०-८ अशी आघाडी घेण्यात आली. भारतीय जोडी संकटात आली. पण सात्विकने आणखी एक जलद स्मॅश मारून स्कोअर १२-१२ असा बरोबरीत आणण्यात यश मिळवले. त्यानंतर भारतीय जोडीने सामन्यावर आपली पकड अधिक मजबूत करत स्कोअर १७-१५ असा केला. त्यानंतर लवकरच स्कोअर १९-१५ असा पुढे सरकला झाला आणि चेनच्या एका चुकीमुळे सात्विक आणि चिराग जोडीला पाच मॅच पॉइंट मिळाले आणि भारताचा विजय निश्चित झाला.