भारतीय महिला हॉकी संघ(फोटो-सोशल मीडिया)
India vs China : भारतीय महिला संघाला महिला हॉकी आशिया कपमध्ये मोठा धक्का बसला आहे. या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ सुरुवातीपासूनच चांगला लयीत दिसत होता. परंतु, भारताचा विजयी रथ चीनने रोखला आहे. भारताला या स्पर्धेत चीनकडून पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सुपर-४ च्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला चीनने ४-१ असे पराभूत केले आहे. यासह, आता भारतीय महिला हॉकी संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी काहीही करून पुढचा सामना जिंकावा लागणार आहे.
गुरुवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात यजमान चीनने भारतीय महिला संघाला कोणती देखील संधी दिली नाही. भारताकडून मुमताज खानने ३९ व्या मिनिटाला एकमेव गोल होता. त्यांनंतर चीनने आपला दबदबा राखला. चीनकडून झोउ मीरोंग (चौथा आणि ५६ वा मिनिट), चेन यांग (३१ वा मिनिट) आणि टॅन जिन्झुआंग (४९ वा मिनिट) यांनी गोल डागले. भारतीय संघ पूल टप्प्यातमध्ये अपराजित राहिला होता. त्यांनी थायलंड आणि सिंगापूर या संघांचा पराभव केला होता तर जपानसोबत बरोबरी साधली होती. सुपर ४ टप्प्यातील पहिल्या सामन्यात भारताने कोरियाचा ४-२ असा पराभव केला होता.
हेही वाचा : मोठी बातमी! IND VS PAK सामन्यावर बहिष्कार? माजी क्रिकेटपटूने थोपटले दंड; म्हणाला, ‘सामना पाहणार नाही..
भारतीय संघ संधींचा फायदा घेऊ शकला नाही आणि तीन पेनल्टी कॉर्नरपैकी एकाहीवर गोल करण्यात यश आले नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी आक्रमण करून संधी निर्माण होत्या. चौथ्या मिनिटाला मीरोंगने रिबाउंडवर गोल केल्याने चीनने आघाडी मिळवली. भारताला दहाव्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण चिनी बचावपटूंनी चांगला बचाव करत गोल होऊ दिला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्येही गोल करता आला नाही.
२७ व्या मिनिटाला भारताला अजून एका पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली पण पुन्हा अपयश हाती आले. तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या मिनिटाला चीनकडून गोल करून दबाव वाढवण्यात आला. भारतीय खेळाडूंनी त्यांच्याच वर्तुळात यांगला चेंडू भेट म्हणून देण्यात आला आणि यांगने सहज गोल करण्यात यश मिळवले. दरम्यान, मुमताजने ३९ व्या मिनिटाला गोल करून भारताला सामन्यात आणले. पण त्यानंतर चीनने आपले वर्चस्व राखले.
शेवटच्या क्वार्टरमध्ये, चीनने ४७ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर संधी साधून गोल केला. त्याच वेळी, मीरोंगने ५६ व्या मिनिटाला आणखी एक गोल करून चीनच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता भारताला शुक्रवारी जपानविरुद्ध दोन हात करावे लागणार आहे.