Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: हरमनप्रीतच्या संघासमोर जपानचे आव्हान; श्रेयसच्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरी

Men's Women's Cricket Team Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत यजमान जपानविरुद्ध आपल्या विजेतेपदाच्या बचावाला सुरुवात करेल, तर पुरुष संघाने अव्वल मानांकन मिळाल्यामुळे थेट टॉप- ८ संघांमध्ये स्थान मिळवले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 24, 2026 | 01:56 PM
Asian Games 2026: हरमनप्रीतच्या संघासमोर जपानचे आव्हान; श्रेयसच्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरी
Follow Us
Follow Us:
  • आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत क्रिकेटचे आयोजन
  • हरमनप्रीतच्या संघासमोर जपानचे आव्हान
  • श्रेयसच्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरी
आयची-नागोया (Aichi Prefecture and Nagoya) आशियाई ( Asian Games 2026) खेळांमधील क्रिकेट स्पर्धेची अधिकृत ड्रॉ जाहीर करण्यात आली. यामुळे गतविजेत्या भारतीय पुरुष आणि महिला संघांचा पुढील प्रवास निश्चित झाला आहे. भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत यजमान जपानविरुद्ध आपल्या विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल. तर अव्वल मानांकन मिळाल्यामुळे पुरुष संघाने थेट अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवले आहे.

ललित मोदींना मोठा दिलासा; IPL 2009 FEMA प्रकरणात क्लीन चीट, 16 वर्षांनी मायदेशी परतणार

हांगझू २०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत जपानशी सामना करेल. जर भारताने हा सामना जिंकला, तर उपांत्य फेरीत त्यांचा सामना बांगलादेश आणि चीन यांच्यातील सामन्याच्या विजेत्याशी होईल. दुसरीकडे, श्रीलंकेचा सामना मलेशियाशी, तर पाकिस्तानचा सामना थायलंडशी होईल. या दोन सामन्यांचे विजेते दुसऱ्या उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध खेळतील.

थेट उपांत्यपूर्व फेरीत

पुरुष क्रिकेटमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी अव्वल चार मानांकित संघ असल्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे. परंतु, त्यांचे प्रतिस्पर्धी पात्रता फेरीनंतर ठरवले जातील. पात्रता फेरीचे संघ दोन गटात विभागले आहेत. ‘अ’ गटात अफगाणिस्तान, जपान आणि नेपाळ आहेत, तर ‘ब’ गटात हाँगकाँग, चीन, मलेशिया आणि ओमान यांचा समावेश आहे. दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील आणि मानांकित संघांशी सामना करतील.

महिला क्रिकेट स्पर्धा १७ सप्टेंबरपासून सुरू

महिला क्रिकेट स्पर्धा १७ ते २२ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाईल, तर पुरुष क्रिकेट स्पर्धा २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली जाईल. सर्व सामने आयची प्रांतातील कोरोगी ॲथलेटिक पार्क येथे टी२० फॉरमॅटमध्ये खेळले जातील आणि त्यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय (T20I) दर्जा असेल.

हरमनप्रीत कौर भारतीय महिला संघाचे कर्णधारपद भूषवेल, तर स्मृती मंधाना उपकर्णधार असेल. श्रेयस अय्यर पुरुष संघाचे नेतृत्व करेल, तर तिलक वर्मा उपकर्णधार असेल. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचाही १५ सदस्यीय भारतीय पुरुष संघात समावेश करण्यात आला आहे.

ऑलिम्पिकआधी आशियाई खेळ ठरणार महत्वाचे

आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचा चौथ्यांदा समावेश होणार आहे. यापूर्वी २०१० ग्वांगझू, २०१४ इंचिओन आणि २०२३ हांगझू आशियाई खेळांमध्ये क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात आली होती. गेल्या वेळी भारताने पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला होता. आयची-नागोया आशियाई खेळ विशेष मानले जातात, कारण २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये १२८ वर्षांच्या कालावधीनंतर क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे.

Commonwealth Games 2026 साठी टीम इंडिया सज्ज! भारतीय खेळाडूंचे सामने कधी अन् कुठे रंगणार? संपूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

Web Title: Asian games 2026 cricket draw india women vs japan men direct quarterfinal aichi nagoya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • asian games
  • Shreyas Iyer
  • Womens cricket team

संबंधित बातम्या

IND Vs ZIM Live: वैभवचं वादळ अन् ‘सरपंच’ अय्यरचा जीव पडला भांड्यात; झिम्बाब्वेचा धुव्वा अन् दणदणीत विजय
1

IND Vs ZIM Live: वैभवचं वादळ अन् ‘सरपंच’ अय्यरचा जीव पडला भांड्यात; झिम्बाब्वेचा धुव्वा अन् दणदणीत विजय

IND Vs ZIM Live: श्रेयस अय्यरने जिंकला टॉस; पीच रिपोर्टनुसार घेतला थेट ‘हा’ निर्णय
2

IND Vs ZIM Live: श्रेयस अय्यरने जिंकला टॉस; पीच रिपोर्टनुसार घेतला थेट ‘हा’ निर्णय

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…
3

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…

IND vs ZIM: सामन्याची वेळ आणि प्लॅटफॉर्ममध्ये अचानक झाला बदल! India – Zimbabwe T20 कुठे आणि कशी पाहणार Live
4

IND vs ZIM: सामन्याची वेळ आणि प्लॅटफॉर्ममध्ये अचानक झाला बदल! India – Zimbabwe T20 कुठे आणि कशी पाहणार Live

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.