AUSvs SA (Photo Credit- X)
AUS vs SA 2nd ODI: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्याच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. मलिकेतील पहिला सामना केर्न्स येथील काझाली स्टेडियमवर येथे खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कांगारुचा ९८ धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे केशव महाराज. त्याने आपल्या फिरकीय जादूने कांगारुना झुकवले. आणि मालिकेवर १-० अशी बढत मिळवली. आता मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. तर हा सामना चाहत्यांना टीव्ही आणि ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येणार आहे यांची माहिती जाणून घेवूया.
दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना २२ ऑगस्ट रोजी ग्रेट बॅरियर रीफ अरेना येथे खेळला खेळला जाईल. भारतीय चाहते हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील थेट टीव्हीवर थेट पाहू शकतात. त्याच वेळी, या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार अॅपवर केले जाईल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार सकाळी १०:०० वाजता सुरू होतील. सकाळी ९:३० वाजता दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी मैदानात येतील.
पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ गडी गमावून २९६ धावा केल्या. संघाकडून एडेन मार्करामने ८२, टेम्बा बावुमाने ६५ आणि मॅथ्यू ब्रीट्झकेने ५७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, ऑस्ट्रेलियन संघ ४१.५ षटकांत १९८ धावांवर ऑलआउट झाला. या सामन्यात कर्णधार मिशेल मार्शने ८८ धावा केल्या पण उर्वरित फलंदाज अपयशी ठरले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी केशव महाराजने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि पाच बळी घेतले.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एकदिवसीय सामना ९८ धावांनी जिंकून इतिहास रचला आहे. हा दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियन भूमीवरील एकदिवसीय क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सर्वात मोठा विजय आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेने १९९४ मध्ये पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकदिवसीय सामना ८२ धावांनी जिंकला होता. आता दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियन भूमीवर एकदिवसीय सामना मोठ्या फरकाने जिंकून चमत्कार केला आहे.
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), लुआन-ड्रे प्रिटोरियस, एडन मार्कराम, डेवाल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स, वियान मुल्डर, केशव महाराज, लुंगी एनगिडी, नांद्रे बर्गर, मॅथ्यू ब्रीट्झके, सेनुरन मुथुसामी, टोनी डी जॉर्जी, कॉर्बिन बॉश, प्रेनेलन सुब्रायन
ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), आरोन हार्डी, कूपर कॉनोली, बेन द्वारशुइस, जोश हेझलवुड, अॅडम झांपा, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, अॅलेक्स केरी, झेवियर बार्टलेट