मिचेल स्टार्क(फोटो-सोशल मीडिया)
Mitchell Starc created history in Test cricket : जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025 च्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला आहे. येथे वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना जमैकाची राजधानी किंग्स्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने मोठी कामगिरीत करत इतिहास रचला आहे. आता तो ऑस्ट्रेलियाच्या कसोटीतील महान गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
स्टार्कने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आपला १०० वा सामना खेळत आहे. यासह, तो ग्लेन मॅकग्ग्रानंतर सर्वाधिक कसोटी खेळणारा दुसरा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज बनला आहे. स्टार्कपूर्वी हा विक्रम ग्लेन मॅकग्राच्या नावावर जमा होता.
हेही वाचा : IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत वैभव सूर्यवंशीची बॅट फेल, आयुष म्हात्रेने केला कहर
मिचेल स्टार्कने २०११ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाकडून आपले कसोटी पदार्पण केले. आता तो ऑस्ट्रेलिया संघासाठी १०० कसोटी खेळणारा १५ वा खेळाडू बनला आहे. तसेच, स्टार्क आता १०० कसोटी सामने खेळणारा जगातील ११ वा वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआधी जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, कोर्टनी वॉल्श, ग्लेन मॅकग्रा, चामिंडा वास, शॉन पोलॉक, टिम साउदी, इशांत शर्मा, वसीम अक्रम आणि मखाया एन्टिनी या गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. आता या यादीत स्टार्क देखील सामील झाला आहे.
याशिवाय, मिचेल स्टार्क कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेट्स घेण्याच्या जवळ आहे. त्याने ९९ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ३९६ विकेट्स टिपल्या आहेत. अशाप्रकारे, तो विकेट घेण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा चौथा सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याला ४०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी केवळ ४ विकेट्सची आवश्यकता आहे. या यादीत दिग्गज शेन वॉर्न अव्वल स्थानावर विराजमान आहे.
हेही वाचा : IND vs ENG : ‘सुपरवुमन’ राधा यादव! हवेत उडून घेतला शानदार कॅच, Video Viral
आपण वेस्ट इंडिजसोबतच्या कसोटी मालिकेबद्दल सांगायच झालं तर आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. या काळात ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे. आता त्याचे लक्ष तिसरा कसोटी सामना जिंकण्यावर आहे. सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया केवळ २२५ धावा करू शकली. या काळात वेस्ट इंडिजकडून शामर जोसेफने सर्वाधिक ४ बळी घेतले आहेत. पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर वेस्ट इंडिजने १ गडी गमावून १६ धावा केल्या होत्या.