भारतीय पुरुष हॉकी संघ(फोटो -सोशल मीडिया)
Azlan Shah Cup 2025 : ३१ वा सुलतान अझलन शाह कपमध्ये स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. या कपसाठी बचावपटू संजय भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व करेल. कारण नियमित कर्णधार हरमनप्रीत सिंगसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना २३ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मलेशियातील इपोह येथे होणाऱ्या प्रतिष्ठित आमंत्रण स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारताचे दोन्ही पहिल्या पसंतीचे गोलकीपर, कृष्णा बहादूर पाठक आणि सूरज करकेरा यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी पवन आणि मोहित होनहल्ली शशिकुमार यांची निवड करण्यात आली आहे.
संजय, जुगराज सिंग आणि अमित रोहिदास हे बचावफळीत समाविष्ट असलेले तीन वरिष्ठ खेळाडू आहेत. पूवन्ना चंदुरा बॉबी, नीलम संजीप झेस आणि यशदीप सिवाच यांचाही बचावफळीत समावेश आहे. मधल्या फळीची जबाबदारी राजेंद्र सिंग, राजकुमार पाल, नीलकांत शर्मा, रविचंद्रन सिंग, विवेक सागर आणि मोहम्मद रहीम मोसिन यांच्यावर असेल. सुखजीत सिंग, शिलानंद लाक्रा, सेल्वम कार्ती, आदित्य अर्जुन लालागे, दिलप्रीत सिंग आणि अभिषेक हे फॉरवर्ड फळीतील खेळाडू असतील.
भारतीय संघ २३ नंतर बेल्जियम (२४ नोव्हेंबर), यजमान मलेशिया (२६ नोव्हेंबर), न्यूझीलंड (२७ नोव्हेंबर) आणि कॅनडा (२९ नोव्हेंबर) विरुद्ध सामने खेळेल. ही स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल, ज्यामध्ये अव्वल दोन संघ ३० नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. भारताने शेवटचा २०१० मध्ये सुलतान अझलन शाह कप जिंकला होता आणि २०१९ मध्ये उपविजेता ठरला होता.
सुलतान अझलन शाह चषक हा आंतरराष्ट्रीय हॉकी कॅलेंडरमधील नेहमीच एक महत्त्वाची स्पर्धा राहिली आहे आणि आम्ही एका संतुलित संघासह सहभागी होण्यास उत्सुक आहोत. आम्हाला या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची आशा आहे. भारत २३ नोव्हेंबर रोजी कोरियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. क्रेग फुल्टन (भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक)
भारतीय संघ
गोलरक्षकः पवन, मोहित शशीकुमार. बचावपटूः चंदुरा बॉबी, नीलम संजीप झेस, यशदीप सिवाच, संजय, जुगराज सिंग, अमित रोहिदास. मध्यभागीः राजिंदर सिंग, राजकुमार पाल, नीलकांत शर्मा, मोइरंगथेम सिंग, विवेक सागर प्रसाद, मोहम्मद राहिल मौसिन. फॉरवर्डः सुखजीत सिंग, शिलानंद लाक्रा.






