Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉर्ड्सवर Rohit Sharma चा शेवटचा सामना? निवृत्तीच्या चर्चांवर प्रशिक्षकांचे स्पष्ट उत्तर

Batting Coach on rohit Sharma retirement from ODI: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चांनी सध्या जोर धरला आहे. त्यातच संघाच्या प्रशिक्षकांनी रोहितच्या फॉर्मवर महत्वपूर्ण विधान केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 17, 2026 | 01:28 PM
लॉर्ड्सवर Rohit Sharma चा शेवटचा सामना? निवृत्तीच्या चर्चांवर प्रशिक्षकांचे स्पष्ट उत्तर
Follow Us
Follow Us:
  • लॉर्ड्सवर Rohit Sharma चा शेवटचा सामना?
  • निवृत्तीच्या चर्चांवर प्रशिक्षकांचे स्पष्ट उत्तर
  • रोहितवर कोणताही प्रकारचा दबाव नाही
इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कार्डिफ स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. समालीसाठी आलेल्या रोहितने ४७ चेंडूमध्ये २६ धावा केल्या. सामन्यानंतर भारतीय माजी कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांना जोर धरला आहे. या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी रोहितच्या निवृत्तीच्या अफवांवर महत्वपूर्ण विधान केले आहे.

IND vs ENG: मैदानातील एक चूक अन् करियर धोक्यात? आयसीसीची Gurnoor Brar वर कारवाई

‘रोहितवर कोणताही प्रकारचा दबाव नाही…’

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर, जेव्हा फलंदाजी प्रशिक्षक कोटक यांना विचारण्यात आले की, भारतीय संघ सलामीवीर म्हणून रोहित शर्माऐवजी यशस्वी जैस्वाल किंवा ईशान किशन यांना संधी देण्याचा विचार करत आहे का, तेव्हा त्यांनी रोहितचा बचाव करत म्हटले, ‘मला नाही वाटत की रोहित शर्मासारखा मोठा खेळाडू कोणत्याही दबावाखाली येऊ शकतो. तो इतका महान खेळाडू आहे की या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत नाही. हो, त्याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये धावा केल्या नाहीत, पण त्याने काही फरक पडत नाही. दुसऱ्या सामन्यातही तो मोठी खेळी करेल असे वाटत होते, पण ठीक आहे.’

रोहितच्या संथ फलंदाजीचा बचाव करताना कोटक म्हणाले की, ‘मी खूप क्रिकेट खेळलो आहे आणि पाहिले आहे. कधीकधी फलंदाजांना हवा असलेला मोमेंटम मिळत नाही आणि हे सामान्य आहे. लॉर्ड्सवर तुम्हाला रोहित शर्माची एक पूर्णपणे वेगळी खेळी पाहायला मिळेल. त्यामुळे, तो संघर्ष करत होता असे मी म्हणणार नाही. कदाचित बाउन्यमुळे त्याला त्याचे नेहमीचे शॉट्स खेळता येत नव्हते. दुसरीकडे, शुभमन आणि विराटने वेगवान सुरुवात केली, पण रोहितला त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू मिळत नव्हते. त्यामुळे, रोहितसारख्या खेळाडूसाठी ‘संघर्ष’ हा शब्द वापरणे योग्य ठरणार नाही.’

लॉर्ड्सवर रोहितचा खेळणार शेवटचा सामना

२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवून, भारतीय संघ आता प्रत्येक मालिकेची तयारी करत आहे. वृत्तानुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने रोहित शर्माला कळवले आहे की, तो २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या योजनांचा भाग असणार नाही. परिणामी, १९ जुलै रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध होणारा तिसरा एकदिवसीय सामना रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरू शकतो.

FIFA World Cup 2026 Final: मेस्सी vs यामाल आमनेसामने! अर्जेंटिना-स्पेन महामुकाबला कधी? भारतात कुठे आणि कसा पहाल?

Web Title: Batting coach sitanshu on rohit sharma odi retirement lords last odi match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • IND Vs ENG
  • ODI World Cup 2027
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

महाभयंकर रेकॉर्ड! Virat Kohli-Rohit Sharma ची जोडी रचणार ‘हा’ विक्रम; ‘लॉर्ड्स’ असणार साक्षीदार
1

महाभयंकर रेकॉर्ड! Virat Kohli-Rohit Sharma ची जोडी रचणार ‘हा’ विक्रम; ‘लॉर्ड्स’ असणार साक्षीदार

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्ती घेणार? आई-वडील लंडनमध्ये, Lord’s वर खेळणार Hitman शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना
2

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्ती घेणार? आई-वडील लंडनमध्ये, Lord’s वर खेळणार Hitman शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना

IND Vs ENG : शतक हुकलं तरी ‘रूट’ने दाखवला रुबाब ! ‘टीम इंडिया’चा 4 विकेट्सने पराभव
3

IND Vs ENG : शतक हुकलं तरी ‘रूट’ने दाखवला रुबाब ! ‘टीम इंडिया’चा 4 विकेट्सने पराभव

IND vs ENG 2nd ODI: २ जीवनदान, सलग ८ डॉट बॉल अन् ४७ चेंडूत फक्त २६ धावा; ‘असा’ कसा खेळणार Rohit Sharma २०२७ चा वर्ल्ड कप?
4

IND vs ENG 2nd ODI: २ जीवनदान, सलग ८ डॉट बॉल अन् ४७ चेंडूत फक्त २६ धावा; ‘असा’ कसा खेळणार Rohit Sharma २०२७ चा वर्ल्ड कप?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.