Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs BAN: भारत-बांग्लादेश मालिकेबाबत सस्पेन्स संपला! तमीम इक्बालने केला मोठा खुलासा, म्हणाले…

Tamim Iqbal on IND vs BAN series: भारत-बांग्लादेश मालिकेसंदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी भारतीय संघाच्या बांगलादेश दौऱ्यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 31, 2026 | 06:58 PM
Tamim Iqbal on IND vs BAN series

Tamim Iqbal on IND vs BAN series

Follow Us
Follow Us:
  • भारत-बांग्लादेश मालिकेबाबत मोठी अपडेट
  • तमीम इक्बालने सांगितला संपूर्ण प्लॅन
  • मालिकेबाबत सस्पेन्स केला दूर
भारत आणि बांग्लादेश यांच्यात सप्टेंबर २०२६ मध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार होती. मात्र, ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. भारतीय संघ सप्टेंबर २०२६ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळेल आणि त्यानंतर २०२६ च्या आशियाई खेळांसाठी जपानला रवाना होईल. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी आता भारत-बांग्लादेश मालिकेबाबत एक मोठी माहिती दिली आहे.

कोर्टवर उलट्या, शरीर थकलं पण शेवटपर्यंत लढला! Navone ने Djokovic ला US Open मधून बाहेर काढलं; २४ ग्रँडस्लॅमचा चॅम्पियन ढसाढसा रडला

भारत-बांग्लादेश मालिकेबाबत मोठी बातमी

बांग्लादेशमध्ये भारताविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका आयोजित होणार होती, परंतु सध्या राजकीय संबधातील तणावामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली. परंतु, तमीम इक्बालने स्पष्ट केले की भारत-बांग्लादेश मालिका पूर्णपणे रद्द झालेली नाही. तमीम इक्बालने सांगितले की, बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) दोन्ही ही मालिका आयोजित करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. त्याने पुढे सांगितले की, दोन्ही मंडळे आता मालिकेसाठी नवीन विंडो शोधण्याकरिता एकत्र काम करत आहेत. तमीमच्या म्हणण्यानुसार, ही मालिका ऑगस्ट-सप्टेंबर या नियोजित कालावधीत होणार नाही, तर ती पुढे ढकलण्यात आली आहे.

भारत-बांगलादेश मालिकेबद्दल तमीम इक्बाल काय म्हणाला?

तमीम इक्बाल ‘नॉट आऊट नोमान’ या क्रीडा मंचावर सांगितले की, बांग्लादेश आणि भारत या दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड ही मालिका आयोजित करण्याबाबत गंभीर आहेत आणि त्यासाठी एका नवीन संधीच्या शोधात आहेत. त्यांनी सांगितले की, बीसीबीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे, परंतु काही गोष्टी त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि बोर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांना आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडायची नाही. दोन्ही देशांचे क्रिकेट वेळापत्रक व्यस्त आहे. बांग्लादेशच्या तीन आगामी मालिका आहेत आणि भारतीय संघाचे वेळापत्रकही खूप व्यस्त आहे. असे असूनही, दोन्ही बोर्ड मालिकेसंदर्भात एकमेकांच्या सतत संपर्कात आहेत.

बांग्लादेश टी२० विश्वचषकातून बाहेर पडला

भारतात टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा आयोजित केली होती. बांग्लादेश आपले सर्व सामने भारतात खेळणार होता. परंतु, अचानक सुरक्षेच्या कारणास्तव, बांग्लादेशने आपले सामने श्रीलंकेत हलवण्याचा प्रस्ताव आयसीसीकडे ठेवला. मात्र, वेळापत्रक आधीच जाहीर झाल्यामुळे, आयसीसीने बांग्लादेशची विनंती फेटाळली. त्यानंतर बांग्लादेशने भारतात न जाण्याचा निर्णय घेतला आणि टी२० विश्वचषक २०२६ मधून माघार घेतली.

आयपीएल २०२६ च्या संघातून मुस्तफिजुर रहमानला वगळल्यानंतर हा मुद्दा समोर आला. बीसीसीआयच्या आदेशानुसार केकेआरने त्याला संघातून मुक्त केले होते. या निर्णयामुळे बीसीबी खूप नाराज झाली होती. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. यानंतर, भारताने त्यावेळी बांग्लादेशचा दौरा केला नाही.

Hockey World Cup 2026: ४४ व्या मिनिटाला Michel Struthoff चा ‘मॅजिक टच’! एकमेव गोल ठरला गेमचेंजर; जर्मनी पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन

Web Title: Bcb tamim iqbal latest update on ind vs ban series 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • BCB
  • BCCI India
  • IND VS BAN

संबंधित बातम्या

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?
1

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?

Hardik-Bumrah च्या फिटनेसवर मोठी अपडेट! अफगाणिस्तान मालिकेत मैदानावर दिसणार? प्रिन्स यादव पूर्णपणे फिट
2

Hardik-Bumrah च्या फिटनेसवर मोठी अपडेट! अफगाणिस्तान मालिकेत मैदानावर दिसणार? प्रिन्स यादव पूर्णपणे फिट

Asian Games 2026: जपानच्या सुविधांवर BCCI नाराज? आशियाई स्पर्धेसाठी ‘B’ टीम पाठवणार; स्टार खेळाडूंना मिळणार विश्रांती
3

Asian Games 2026: जपानच्या सुविधांवर BCCI नाराज? आशियाई स्पर्धेसाठी ‘B’ टीम पाठवणार; स्टार खेळाडूंना मिळणार विश्रांती

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय
4

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.