Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?

Sri Lanka series BCCI summoned Star players for fitness test: श्रीलंका दौरा संपताच बीसीसीआयने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी सर्व स्टार खेळाडूंना फिटनेस टेस्टसाठी बोलावले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 30, 2026 | 05:53 PM
BCCI summoned Star players for fitness test

BCCI summoned Star players for fitness test

Follow Us
Follow Us:
  • श्रीलंका दौरा संपताच BCCI अॅक्शनमध्ये
  • सर्व स्टार खेळाडूंना बोलावलं
  • कोणते खेळाडू राहिले गैरहजर
भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेला १-० ने पराभूत केले. गॉल येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला १६५ धावांनी हरवले. तर, कोलंबो येथे खेळवला गेलेला दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला . श्रीलंका मालिकेच्या अवघ्या दोन दिवसांतच, बीसीसीआयने आपल्या सर्व स्टार खेळाडूंना फिटनेस टेस्टसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये बोलावले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून खेळाडूंच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बीसीसीआय समोर देखील एक मोठे आव्हान आहे.

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात ‘नो हँडशेक’ पॉलिसी कायम राहणार? अमोल मुझुमदार म्हणाले…

बीसीसीआयचे टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंना आदेश

श्रीलंका दौरा संपल्यानंतर, बीसीसीआयने आपल्या स्टार खेळाडूंना फिटनेस टेस्टी बोलावले आहे. अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा, विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल यांच्यासह टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर, टी-२० विशेषज्ञ रिंकू सिंग, संजू सॅमसन आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हे बीसीसीआयच्या फिटनेस चाचणीत घाम गाळताना दिसले.

कोणत्या आहेत फिटनेस टेस्ट ?

फिटनेस टेस्टमध्ये ब्रॉन्को टेस्ट, २-किलोमीटर धावणे, यो-यो टेस्ट आणि विकेट्समध्ये धावण्यासारख्या क्रिकेट-संबंधित सरावांचा समावेश आहे. ब्रॉन्को टेस्टमध्ये, सुरुवातीच्या बिंदूवर (० मीटर), २० मीटर, ४० मीटर आणि ६० मीटरवर कोन्स ठेवले जातात. खेळाडूंना न थांबता पाच सेटमध्ये ० ते २० मीटर आणि परत, नंतर ४० मीटर आणि ६० मीटर धावावे लागते. एकूण १२०० मीटर अंतर ५ मिनिटे आणि ३० सेकंदात पार करावे लागते. यो-यो टेस्टचा मानक १६.५ आहे, तर २-किलोमीटर धावणे (२००० मीटर) १० मिनिटांच्या आत पूर्ण करावे लागते. याव्यतिरिक्त, यो-यो टेस्ट आणि विकेट्समध्ये स्प्रिंटिंग यांसारखे क्रिकेट-विशिष्ट सराव प्रकार देखील घेतले जातात.

The pre season testing for the contracted players was conducted at the BCCI Centre of Excellence 👌 The players who had to undergo the mandated fitness arrived in batches and completed their respective tests ahead of a busy season 💪 pic.twitter.com/64LsSByytP — BCCI (@BCCI) August 29, 2026

सिराज आणि कृष्णा यांना मिळाली सूट

मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना या फिटनेस टेस्टमधून सूट देण्यात आली आहे. संघ त्यांना सध्या थोडी विश्रांती देऊ इच्छितो. आयपीएल २०२७ सुरू होईपर्यंत बीसीसीआय वेळोवेळी या फिटनेस चाचण्या घेत राहील. परंतु, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी हे पूर्णपणे फिट घोषित झाल्यानंतरच या फिटनेस टेस्टमध्ये सहभागी होतील.

सप्टेंबरमध्ये सुरू होणार नवीन मालिका

भारतीय क्रिकेट संघाचा नवीन देशांतर्गत हंगाम सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. बीसीसीआयच्या नवीन वेळापत्रकानुसार, भारत सर्वप्रथम नवी दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. यानंतर लगेचच, दोन वेगवेगळे भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरतील. मुख्य टी-२० संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जपानला रवाना होईल, तर दुसरा संघ मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळेल.

Duleep Trophy 2026: मैदानात असं काय घडलं? कर्णधार अचानक मैदानाबाहेर अन् 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi बनला कॅप्टन

Web Title: Bcci summoned star players for mandatory fitness test within 48 hours of sri lanka series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • BCCI India
  • Fitness Test
  • Hardik Pandya
  • Ravindra Jadeja
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड
1

IND vs WI: T20 क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा दबदबा! सरपंचने मोडला फिनिशर Dhoni चा ‘हा’ महारेकॉर्ड

Ravindra Jadeja Century: जड्डूची बॅट तळपली! रणजी ट्रॉफीत ठोकलं खणखणीत शतक, न्यूझीलंड दौऱ्याआधी दाखवला दम
2

Ravindra Jadeja Century: जड्डूची बॅट तळपली! रणजी ट्रॉफीत ठोकलं खणखणीत शतक, न्यूझीलंड दौऱ्याआधी दाखवला दम

IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?
3

IND vs WI 4th T20I: टीम इंडियाचा विजयाचा चौकार की विंडीजचा पलटवार? चौथा सामना कधी अन् कुठे?

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report
4

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.