Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटविश्व हादरलं! Asian Games 2026 टीम इंडियाचे खेळाडू जाहीर? मात्र Suryakumar Yadav ला झटका

भारताचे माजी दिग्गज फलंदाज आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही व्ही. एस लक्ष्मण हे आशियाई गेम्समध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. जून महिन्याच्या अखेरीस 30 पैकी खेळाडूंचा मुख्य संघ जाहीर केला जाऊ शकतो.

  • By तेजस भागवत
Updated On: May 30, 2026 | 04:03 PM
क्रिकेटविश्व हादरलं! Asian Games 2026 टीम इंडियाचे खेळाडू जाहीर? मात्र Suryakumar Yadav ला झटका
Follow Us
Follow Us:

आशियाई खेळांमध्ये व्ही. व्ही. एस लक्ष्मण असणार हेड कोच 
सूर्यकुमार यादव नाही करणार भारताचे नेतृत्व 
अनेक नव्या खेळाडूंना देण्यात आली संधी

BCCI: सध्या भारतात आयपीएलचा हंगाम सुरू आहे. उद्या आयपीएल 2026 चा अंतिम सामना गुजरात आणि बंगळुरूमध्ये होणार आहे. दरम्यान याच वेळेस आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 लवकरच सुरू होणार आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने 30 खेळाडूंची संभाव्य यादी जाहीर केली. आहे त्यात मोठा फेरबदल दिसून येत आहे. हा विषय नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.

या वर्षी 19 सप्टेंबरपासून जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहे. यासाठी बीसीसीआयने संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मात्र या टीममध्ये सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आलेले नाही. म्हणजेच या संघाचे सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून नेतृत्व करताना दिसून येणार नाहीये. त्यामुळे आशियाई खेळात सूर्याची कप्तानी आणि आक्रमक फलंदाजी चाहत्यांना पाहता येणार नाही.

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?

बीसीसीआयने 30 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआय भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून वैभवकडे पाहत असून, जपानच्या मैदानावर त्याला आंतरराष्ट्रीय मंचावर चमकण्याची मोठी संधी मिळू शकते. त्याने आयपीएलमध्ये शानदार खेळी केली आहे. त्यामुळे वैभवला स्थान देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

भारताचे माजी दिग्गज फलंदाज आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही व्ही. एस लक्ष्मण हे आशियाई गेम्समध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. जून महिन्याच्या अखेरीस 30 पैकी खेळाडूंचा मुख्य संघ जाहीर केला जाऊ शकतो.

19 वर्षांचा रेकॉर्ड उद्ध्वस्त! Shubhman Gill ने केला ‘हा’ महाविक्रम; IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच नोंद

निवड झालेल्या ३० संभाव्य खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश?

यशस्वी जायसवाल, रुतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, रिंकू सिंह, टिळक वर्मा, आयुष बडोनी, वैभव सूर्यवंशी, ऋषभ पंत, ईशान किशन, संजू सैमसन, ध्रुव जुरेल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, अभिषेक शर्मा, वाशिंगटन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, अनुकूल रॉय, शाहबाज अहमद, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, हर्ष दुबे, विप्रज निगम,  जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, खलील अहमद, यश ठाकूर.

 

Web Title: Bcci announcement team india for asian games 2026 vaibhav suryvanshi and leave suryakumar yadav vvs laxman head coach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • asian games
  • Suryakumar Yadav
  • Vaibhav Suryavanshi
  • VVS Laxman

संबंधित बातम्या

Shreyash Iyer : कधी कधी आपल्याला…; वैभव सूर्यवंशीबाबत श्रेयसचं मोठं विधान
1

Shreyash Iyer : कधी कधी आपल्याला…; वैभव सूर्यवंशीबाबत श्रेयसचं मोठं विधान

Ishan Kishan: एका खेळीत विश्वविक्रम! ईशान किशनचा मैदानात धुमाकूळ; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड  मोडत T20I मध्ये रचला इतिहास
2

Ishan Kishan: एका खेळीत विश्वविक्रम! ईशान किशनचा मैदानात धुमाकूळ; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडत T20I मध्ये रचला इतिहास

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?
3

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?

सूर्यकुमार यादवचा विक्रम आता इतिहासजमा! T20I मध्ये Abhishek Sharma बनला नवा ‘सिक्सर किंग’
4

सूर्यकुमार यादवचा विक्रम आता इतिहासजमा! T20I मध्ये Abhishek Sharma बनला नवा ‘सिक्सर किंग’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.