Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: BCCIचा मोठा निर्णय! IPL मध्ये आता ‘या’ गोष्टीवर बंदी; नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई

BCCI Banned Smart Sunglasses In IPL: बीसीसीआयने आयपीएलची सुरक्षा लक्षात घेऊन आणखी एक नियम जारी केला आहे. या नियमानुसार आयपीएलच्या सामन्यांमध्ये स्मार्ट सनग्लासेसवर वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 29, 2026 | 02:28 PM
IPL 2026: BCCIचा मोठा निर्णय! IPL मध्ये आता ‘या’ गोष्टीवर बंदी; नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई
Follow Us
Follow Us:
  • IPL मध्ये स्मार्ट सनग्लासेसवर बंदी
  • नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई
  • BCCIचा मोठा निर्णय
आयपीएल २०२६ स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलमधील सुरक्षा आणि सामन्यांची निष्पक्षता कायम राखण्यासाठी BCCI ने आता स्मार्ट सनग्लासेसच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार, खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांच्या परिसरात म्हणजेच पीएमओए (Players and Match Officials Area) मध्ये स्मार्ट सनग्लासेस वापरण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. वृत्तानुसार, मंडळाने १८ मे रोजी सर्व संघांना याबाबत एक सूचना जारी केली होती. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने (ACU) स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आयपीएलमध्ये सुरक्षेचे नियम आणखी कडक करण्यात आले आहेत.

GT vs RR Qualifier 2: मुल्लानपूरमध्ये हायव्होल्टेज लढत, गुजरात-राजस्थानमध्ये आज फायनलची जंग,खेळपट्टी कोणाला साथ देणार? वाचा पिच र

स्मार्ट सनग्लासेसवर बंदी का घालण्यात आली?

बीसीसीआयने सर्व आयपीएल फ्रँचायझींना या संदर्भात अधिकृत सूचना पाठवली आहे. या सूचनेत म्हटले आहे की, स्मार्ट सनग्लासेसमुळे सामन्यांच्या सुरक्षेला आणि निष्पक्षतेला धोका निर्माण होऊ शकतो. बीसीसीआयने स्मार्ट सनग्लासेसना ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि संवाद साधने म्हणून वर्गीकृत केले आहे, कारण ते मोबाईल डेटा आणि वाय-फायद्वारे संवाद साधू शकतात. तसेच, यामध्ये लाइव्ह स्ट्रीमिंग, टेक्स्ट मेसेजिंग आणि ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग यासारखे फिचर्स असतात. त्यामुळे हे गॉगल्स ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग उपकरणांप्रमाणेच संवाद साधन म्हणूनही वापरले जाऊ शकतात. याच कारणामुळे बीसीसीआयने खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांच्या परिसरात स्मार्ट सनग्लासेसच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

आता मोबाईलसोबत सनग्लासेसही जमा करावे लागणार

बीसीसीआयने सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला नव्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांनुसार, मैदानात प्रवेश करण्यापूर्वी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला त्यांचे मोबाईल फोन, स्मार्टवॉच आणि स्मार्ट सनग्लासेस सुरक्षा संपर्क (SLO) अधिकाऱ्याकडे जमा करावे लागणार आहेत. यापूर्वी फक्त मोबाईल आणि स्मार्ट उपकरणांवर निर्बंध होते, मात्र आता स्मार्ट सनग्लासेसचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. असे न केल्यास कारवाई केली जाईल आणि दंड आकारला जाईल.

नियम मोडल्यास होणार कारवाई

बीसीसीआयने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर कोणत्याही खेळाडूने किंवा सपोर्ट स्टाफ सदस्याने स्मार्ट सनग्लासेस जमा केले नाहीत किंवा पीएमओएमध्ये त्यांचा वापर केला, तर त्याच्यावर आयपीएल आचारसंहितेनुसार कठोर कारवाई केली जाईल. या नियमामुळे आयपीएलमध्ये भ्रष्टाचार आणि डेटा लीक रोखण्यास मदत होईल, असा विश्वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे.

राजस्थानच्या व्यवस्थापकावर झाली कारवाई

आयपीएल २०२६ दरम्यान यापूर्वीही सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रकार समोर आले होते. राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांनी सामन्यादरम्यान डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. व्हिडिओ व्हायरलझाल्यानंतर, बीसीसीआयने त्यांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

IPL सुरक्षेसाठी बीसीसीआयची मोठी पावले

आयपीएल २०२६ मध्ये बीसीसीआयने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेसंदर्भात कडक नियम लागू केले आहेत. बोर्डाने खेळाडूंना परवानगीशिवाय रात्री बाहेर जाण्यास मनाई केली आहे. तसेच, सुरक्षेची चिंता आणि हनी ट्रॅपिंगचा धोका लक्षात घेऊन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या हॉटेल खोल्यांमध्ये बाहेरील पाहुण्यांना प्रवेश करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच, खेळाडूंच्या हॉटेल रूम, बस आणि डगआउटमध्ये देखील बाहेरील व्यक्तींच्या अनधिकृत प्रवेशावर बंदी घातली आहे.

Vaibhav Sooryavanshi: गोलंदाजांच्या धुलाईनंतर ‘बेबी बॉस’वर फिदा झाला ‘युनिव्हर्सल बॉस’; वैभव सूर्यवंशीसाठी ख्रिस गेलची खास पोस्ट

Web Title: Bcci bans smart sunglasses in ipl 2026 new security rules cricket marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • bcci
  • cricket marathi news
  • IPL 2026

संबंधित बातम्या

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !
1

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
2

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

मोठे मोठे पराभव पत्करले गंमतमध्ये! Team India त गंभीरचे ‘गेम प्लॅनिंग’ फ्लॉप; इंग्लंडने पाजले पाणी
3

मोठे मोठे पराभव पत्करले गंमतमध्ये! Team India त गंभीरचे ‘गेम प्लॅनिंग’ फ्लॉप; इंग्लंडने पाजले पाणी

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन
4

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.