Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?

आयसीसीच्या नियमानुसार, 16 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या खेळाडूला मोठ्या खेळाडूंसाठी असलेली चेजिंग रूम वापरता येत नाही. यामुळे वैभव सूर्यवंशीला सर्व ठिकाणी ही सुविधा मिळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 24, 2026 | 09:32 PM
‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?
Follow Us
Follow Us:
  • इंग्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशीला मिळणार स्वतंत्र रूम
  • 1 जुलै पासून सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड दौरा 
  • श्रेयस अय्यर करणार भारताचे नेतृत्व 
India Vs England T20 Series: लवकरच भारत विरुद्ध इंग्लंड सिरिज सुरू होणार आहे. 1 जुलै ते 11 जुलै दरम्यान 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यात स्वतंत्र रूम दिली जाणार आहे. नेमका हा प्रकार काय आहे ते जाणून घेऊयात.

वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यादरम्यान स्वतंत्र रूम दिली जाणार आहे. म्हणजेच अन्य खेळाडूंची ड्रेसिंग रूम एक असणार आहे. तर वैभव सूर्यवंशीला स्वतंत्र चेजिंग रूम दिली जाणार आहे. वैभव सूर्यवंशीचे वय केवळ 15 वर्षे इतके आहे. त्यामुळे आयसीसीला सेफगार्डिंग प्रोसिजरचे पालन करावे लागणार आहे.

आयसीसीच्या नियमानुसार, 16 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या खेळाडूला मोठ्या खेळाडूंसाठी असलेली चेजिंग रूम वापरता येत नाही. यामुळे वैभव सूर्यवंशीला सर्व ठिकाणी ही सुविधा मिळणार आहे. तसेच त्याचे आई-वडील त्याच्यासोबत राहणार आहेत. अद्याप आयर्लंड दौऱ्यात हा नियम लागू करण्यात आला आहे की नाही याची माहिती समोर आलेली नाही.

स्वप्न सत्यात उतरलं! टीम इंडियाची जर्सी मिळताच Vaibhav Sooryvanshi झाला भावूक, Video Viral

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशीसओबात त्याचे आई-वडील देखील सोबत असणार आहेत. बीसीसीआयने त्यांना देखील पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. टीम ज्या हॉटेलमध्ये वास्तव्याला असेल त्याच ठिकाणी ते राहणार आहेत. हे प्रोटोकॉलमध्ये नसले तरी वैभव सूर्यवंशीचे वय लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

टीम इंडियाची जर्सी मिळताच Vaibhav Sooryvanshi झाला भावूक

लवकरच भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात टी 20 सिरिज सुरू होणार आहे. यासाठी भारतीय संघ आणि आयर्लंडचा संघ जाहीर झाला आहे. भारतीय संघात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची निवड झाली आहे. भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न असणाऱ्या खेळाडूचे टीम इंडियाची जर्सी घालण्याचे स्वप्न असते. वैभव सूर्यवंशीचे ते स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यानंतर तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

IND vs IRE: भारतीय टीमला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दौऱ्यातून बाहेर; कोण घेणार जागा?

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचे टीम इंडियाची जर्सी परिधान करण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. आयर्लंड दौऱ्य सुरू होण्याआधी वैभवच्या हातात टीम इंडियाची जर्सी पडताच त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. याबाबतचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेयर केला आहे. यामध्ये वैभव सूर्यवंशी अहिल्यांदच टीम इंडियाची जर्सी परिधान करताना दिसून आला आहे.

 

Web Title: Bcci gave seperate changing room to vaibhav sooryvanshi and parents for india vs engloand tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • bcci
  • IND Vs ENG
  • ind vs ire
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर
1

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
2

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया
3

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड
4

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.