वैभव सूर्यवंशीचा व्हिडिओ व्हायरल (फोटो- ट्विटर)
15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचे टीम इंडियाची जर्सी परिधान करण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. आयर्लंड दौऱ्य सुरू होण्याआधी वैभवच्या हातात टीम इंडियाची जर्सी पडताच त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. याबाबतचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेयर केला आहे. यामध्ये वैभव सूर्यवंशी अहिल्यांदच टीम इंडियाची जर्सी परिधान करताना दिसून आला आहे.
Ladies & Gentlemen The moment the nation has been waiting for has arrived! Vaibhav Sooryavanshi in #TeamIndia jersey. Witness this incredibly special moment ❤️ pic.twitter.com/sUUytFMPVw — BCCI (@BCCI) June 23, 2026
टीम इंडियाची जर्सी परिधान करताच हा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही असे प्रतिक्रिया वैभव सूर्यवंशीने दिली आहे. बालपणी पाहिलेले स्वप्न आज अखेर पूर्ण झाले आहे. जर्सी पाहताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. बीसीसीआयने त्याचा एक व्हिडओ व्हायरल झाला आहे.
IND vs IRE: भारतीय टीमला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दौऱ्यातून बाहेर; कोण घेणार जागा?
वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याने टीम इंडियाचे प्रशिक्षक राघू यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी पार्सल उघडून टीम इंडियाची जर्सी आपल्या हातांमध्ये घेतली. त्यानंतर तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय टीमला मोठा धक्का
आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे या दौऱ्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या डाव्या पायाच्या क्वाड्रिसेप्स स्नायूला दुखापत झाली आहे. BCCI च्या सूत्रांनुसार, तो इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिकाही मुकण्याची शक्यता आहे. नितीश कुमार अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाकडून खेळला होता.
नितीश कुमार रेड्डीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरची आयर्लंड दौऱ्याबद्दलची चिंता वाढली आहे. नितीशच्या आधी, संघाचा मुख्य अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जखमी झाला होता. हार्दिकच्या जागी नितीश खेळणार होता, पण आता तोही संघाबाहेर आहे. श्रेयस अय्यर आणि अजित आगरकर संघात कोणाला स्थान देतील, हे एक आव्हान आहे.






