फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Ishan Kishan: ईशान किशन हा भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आहे. तो भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक देखील आहे. मात्र गेल्या वर्षभरात तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना खेळलेला नाही. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी ईशान किशन हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. बीसीसीआयच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना मुख्य संघात स्थान मिळत नव्हते. मात्र आता ईशान किशन आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच त्याला बीसीसीआयकडून मुख्य संघात खेळण्यासाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
सध्या भारताचा संघ हा बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळात आहे. दरम्यान त्यानंतर भारताचा संघ बांगलादेशविरुद्ध तीन टी-२० सामने खेळणार आहे. या सामन्यांमध्ये ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. ऋषभ पंतच्या किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. रिषभ पंत हा भारताचा सध्याच्या स्थितीमध्ये सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. भारताला अजून कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे कदाचित रिषभ पंतला मिळावी म्हणून ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते.
या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत जर का ईशान किशनला संधी मिळाली तर ईशान किशन तब्बल ९ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल. बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. मात्र अलीकडच्या काळात देशांतर्गत क्रिकेट खेळताना ईशानने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच बीसीसीआय ईशानचा विचारू शकते अशी चर्चा सुरू आहे.
ईशान किशन सध्या भारतीय संघात परतण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सध्या दुलीप ट्रॉफी संघात क्रिकेट खेळत आहे. इंडिया सी या संघातून संघातून तो सध्या खेळत आहे. त्याने पहिल्याच सामन्यात १२६ चेंडूत १११ धावांची खेळी केली. या सामन्यात ईशानने तर गोलंदाजी देखील केली आहे. त्यामुळे ईशान किशन आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी व भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे.