मोहसीन नक्वी(फोटो-सोशल मीडिया)
Mohsin Naqvi apologizes to BCCI : आशिया कप २०२५ ही स्पर्धा या वेळी बरीच चर्चेत राहिली. या स्पर्धेत अनेक वादाला तोंड फुटले खासकरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने वादग्रस्त ठरले. अंतिम फेरीत हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर अनेक नाट्यमयी घटना घडल्या. विजयानंतर, भारतीय संघाने एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दर्शवला. यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी आपल्या सोबत घेऊन गेले. त्यानंतर भारताने ट्रॉफीविनाच सेलिब्रेशन केले आणि ट्रॉफीविनाच भारतीय संघ मायदेशी परतला.
हेही वाचा : IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला
एसीसीच्या बैठकीमध्ये एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी बीसीसीआयची माफी मागितली आहे. त्यांनी सांगितले की जे घडले ते घडायला नको होते. तथापि, ते असे देखील म्हटले की, कर्णधार सूर्यकुमार यादव यांना ट्रॉफी घेण्यासाठी एसीसी कार्यालयात यावे लागेल. त्यांनी ट्रॉफी आणि पदके देण्यास अद्यापही स्पष्टपणे नकार दर्शवला आहे.
आशिया कप २०२५ च्या अंतिम फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर, भारतीय खेळाडूंकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देण्यात आला. कारण ती पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे प्रमुख आणि आशियाई क्रिकेट कौन्सिल (एसीसी) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून सादर करण्यात येणार हप्ती. भारतीय संघाने यूएई क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष यांच्याकडून ट्रॉफी सादर करण्याची मागणी केली गेली. परंतु, नक्वी यांच्याकडून ही मागणी मान्य करण्यास नकार देण्यात आला.
हेही वाचा : आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी
विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जवळजवळ एक तास मैदानावर वाट पाहिली, परंतु जेव्हा त्यांच्या अटी मान्य करण्यात आल्या नाहीत, तेव्हा मात्र भारतीय संघ ट्रॉफीशिवाय ड्रेसिंग रूममध्ये परतला. या नाट्यानंतर मोहसिन नक्वी ट्रॉफी त्यांच्या हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ने बेधडक भूमिका घेतली आणि स्पष्ट केले की ट्रॉफी भारताला देण्यात यायला हवी.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काल पार पडलेल्या एसीसीच्या बैठकीत एसीसी आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांना विचारले होते की, “विजेत्या संघाला ट्रॉफी का सादर केली गेली नाही. ही एसीसीची ट्रॉफी आहे; ती अधिकृतपणे विजेत्या संघाला सादर करायला पाहिजे.”