ब्रिटन हादरला! मँचेस्टरमध्ये यहूदी प्रार्थनास्थळाबाहेर लोकांवर हल्ला ; कारने धडक दिल्यानंतर चाकूने वार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Britain News in Marathi : लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे. ब्रिटनच्या मँचेस्टरमध्ये गुरुवारी (०२ सप्टेंबर) एका यहूही प्रार्थनास्थलाबाहेर लोकांवर हल्ला झाला आहे. एका अज्ञात वेगाने लोकांना कारने धडक दिली आहे, तसेच चाकूनेही वार करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मँचेस्टरच्या क्रॅम्पसॉल भागातील हीटन पार्क हिब्रू सभेबाहेरही घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जखमी झाले आहे. जखींच्या संख्या अद्याप अधिकृत करण्यात आलेली नाही.
घटनेनंतर हल्लेखोराने कार घेऊव पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यावेळी पोलिसांनी त्याला पकडले आणि अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी सुरु असून घटनेमागच्या कारणाचा तपास घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.३० च्या दरम्यान त्यांना घटनास्थळावरुन फोन आला होता. प्रत्यक्षदर्शनींने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने प्रार्थनास्थळाबाहेरील लोकांवर कार चढवली. नंतर कारमधून उतरून त्यांच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपाचारदरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्लेखोरालाही घटनास्थळावरुन पळून जाताना तातडीने अटक केली.
GMP declared PLATO and a major incident at 9.37am.
Shots were fired by Greater Manchester Police firearms officers at 9.38am. One man has been shot, believed to be the offender. — Greater Manchester Police (@gmpolice) October 2, 2025
या घटनेनंतर ब्रिटनच्या मँचेस्टरमधील स्थानिक यहूदी समुदायाता घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त केला आहे. तसेच आरोपीची ओळख अद्यापर जाहीर करण्यात आलेले नाही. पण एका मुस्लिम व्यक्तीने हल्ला केला असल्याचे मानले जात आहे. सध्या ब्रिटनच्या सुरक्षा व्यवस्था आणि कायद्यावर प्रश्न विचारले जात आहे. पण पोलिसांनी नागरिकांना विश्वासात घेऊन अफवांपासून दूर राहण्याचे आणि कोणतीही संशायास्पद हालचाली दिसताच माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
प्रश्न १. ब्रिटनमध्ये कुठे झाला यहूदींवर हल्ला?
ब्रिटनच्या मँचेस्टरमध्ये यहूदी प्रार्थनास्थळबाहेर हल्ला झाला असून एका अज्ञात कार चालकाने लोकांना धडक दिली आहे. तसेच लोकांवर चाकूनेही वार करण्यात आला आहे.
ब्रिटनच्या मँचेस्टमरमध्ये लोकांवर झालेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू, तर अनेक जखमी झाले आहेत.
ब्रिटनच्या मँचेस्टरमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे यहूदी समाजाच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. पण धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मँचेस्टरमध्ये घडलेल्या घटनेवर पोलिसांनी एक आरोपीला अटक केली आहे. सध्या हा हल्ला का करण्यात आला याची चौकशी सुरु आहे.