फोटो सौजन्य – X
भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष आता अशिया कपवर असणार आहे. भारताच्या संघाने नुकत्याच झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये विजय मिळवून ट्रॉफी नावावर केली होती. आता भारताचा संघ हा अ गटामध्ये असणार आहे या गटामध्ये युएई, ओमान आणि पाकिस्तान हे देश आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर आता भारताचा संघ पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती. अशिया कप सुरू होण्याआधी भारताचा मुख्य कोच गौतम गंभीर याने भोलेनाथचे दर्शन घेतले आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यांच्या कुटुंबासह मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात भगवान महाकालचे आशीर्वाद घेतले. स्वातंत्र्यदिनी गंभीरने भगवान भोलेनाथाचे आशीर्वाद घेतले. गंभीरने पहाटे ४ वाजता भस्म आरतीला हजेरी लावली. ४३ वर्षीय गंभीर म्हणाले की, त्यांना तिसऱ्यांदा महाकालचे दर्शन घेण्यात यश आले. त्यांनी असेही म्हटले की- माझ्या कुटुंबावर आणि देशवासीयांवर देवाचे आशीर्वाद राहावेत अशी मी प्रार्थना करतो.
Gautam Gambhir offers prayers at Shri Mahakaleshwar Jyotirlinga Temple in Ujjain ahead of Asia Cup 2025 [Watch] https://t.co/7qkqCXroBk pic.twitter.com/jAbTEYW4gP
— Sportskeeda (@Sportskeeda) August 15, 2025
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, ‘माझा देश, माझी ओळख, माझे जीवन, जय हिंद.’ या फोटोमध्ये गंभीर हातात बॅट धरून भावनिक मूडमध्ये दिसत आहे.
आगामी आशिया कपमध्ये गौतम गंभीर भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आपले विजेतेपद राखण्याच्या उद्देशाने स्पर्धेत प्रवेश करेल. आशिया कप ९ सप्टेंबरपासून सुरू होईल. या स्पर्धेचा ट्रॉफी जिंकण्यासाठी आठ संघ स्पर्धा करतील.
भारतीय संघाला अ गटात स्थान मिळाले आहे, ज्यामध्ये त्यांना पाकिस्तान, ओमान आणि युएईचा सामना करावा लागेल. ब गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर अंतिम सामना टॉप-२ संघांमध्ये खेळवला जाईल.
आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात स्थानासाठी अनेक दावेदार आहेत, त्यामुळे निवडकर्त्यांना खूप डोकेदुखी होणार आहे. कोणता खेळाडू स्थान मिळवण्यात यशस्वी होईल आणि कोणता खेळाडू निराश होईल हे पाहणे मनोरंजक असेल.