Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ सामन्याआधी विराट कोहली पोहोचला बाबा महाकालच्या दर्शनासाठी, भस्म आरतीत झाला सहभागी

शनिवारी सकाळी उज्जैनमधील महाकालचे दर्शन घेतले आणि भस्म आरतीत भाग घेतला. टीम इंडिया सध्या इंदूरमध्ये आहे, जिथे रविवारी न्यूझीलंडविरुद्ध तिसरा आणि निर्णायक सामना खेळणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 17, 2026 | 10:06 AM
फोटो सौजन्य - PTI सोशल मिडिया

फोटो सौजन्य - PTI सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli visited Mahakal in Ujjain : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना सुरू व्हायला काही तास शिल्लक आहेत, या सामन्याचे आयोजन 18 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी आहे. मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना हा दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. कारण जो संघ हा सामना जिंकेल त्याच्या हाती मालिका लागणार आहे. शुभमन गिल हा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा भगवान शिवाचे आशीर्वाद घेतले आहेत. 

त्याने शनिवारी सकाळी उज्जैनमधील महाकालचे दर्शन घेतले आणि भस्म आरतीत भाग घेतला. टीम इंडिया सध्या इंदूरमध्ये आहे, जिथे रविवारी न्यूझीलंडविरुद्ध तिसरा आणि निर्णायक सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी कोहलीने महाकालचे दर्शन घेतले. कोहलीच्या आधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल यांनीही शुक्रवारी महाकाल मंदिराचे दर्शन घेतले. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

घरच्या मैदानावर आयपीएल सामने आयोजित करण्यास उत्सुक RCB, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एआय-सक्षम कॅमेरे बसवण्याचा केला प्रस्ताव

विराट कोहली नंदीच्या मूर्तीजवळ शांत बसलेला दिसला. तो बराच निश्चिंत दिसत होता. कोहलीने यापूर्वीही अनेकदा मंदिराला भेट दिली आहे. त्याने त्याची पत्नी अनुष्कासोबत महाकालचेही दर्शन घेतले आहे. यावेळी कोहली एकटाच आला होता. या मंदिरातील भस्म आरती खूप प्रसिद्ध आहे आणि प्रत्येकजण त्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करतो. कोहलीनेही असेच केले. अलिकडेच, कोहली आध्यात्मिकदृष्ट्या खूप प्रवृत्त असल्याचे दिसून आले आहे. तो आणि त्याची पत्नी अनुष्का देखील अनेक वेळा प्रेमानंद महाराजांना भेट देतात.

#WATCH | Madhya Pradesh | Former Indian Captain and Star Cricketer Virat Kohli offered prayers at Shree Mahakaleshwar Temple in Ujjain. He says, “Jai shree Mahakal…” pic.twitter.com/2UzpgcvFZn — ANI (@ANI) January 17, 2026

कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने ९३ धावा केल्या. त्याने त्याच्या शेवटच्या सहा एकदिवसीय सामन्यांपैकी पाच डावांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, दोनदा शतके झळकावली आहेत. इंदूरमध्ये खेळला जाणारा तिसरा एकदिवसीय सामना हा निर्णायक सामना आहे आणि टीम इंडियासाठी हे महत्त्वाचे आहे की कोहलीची बॅट चांगली कामगिरी करेल आणि भारताने केवळ सामनाच नाही तर मालिकाही जिंकली पाहिजे.

विराट कोहलीने टी20 क्रिकेट त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली आहे. तो आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे. त्याचबरोबर तो आता न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे त्यानंतर तो आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळताना दिसणार आहे.

Web Title: Before the ind vs nz match virat kohli reached baba mahakal for darshan participated in the bhasma aarti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • cricket
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Sports
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

घरच्या मैदानावर आयपीएल सामने आयोजित करण्यास उत्सुक RCB, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एआय-सक्षम कॅमेरे बसवण्याचा केला प्रस्ताव
1

घरच्या मैदानावर आयपीएल सामने आयोजित करण्यास उत्सुक RCB, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एआय-सक्षम कॅमेरे बसवण्याचा केला प्रस्ताव

IND vs BAN U19 : वैभव सुर्यवंशीवर असणार दुसऱ्या सामन्यात नजर! कोणत्या खेळाडूंना मिळणार आज Playing 11 मध्ये स्थान
2

IND vs BAN U19 : वैभव सुर्यवंशीवर असणार दुसऱ्या सामन्यात नजर! कोणत्या खेळाडूंना मिळणार आज Playing 11 मध्ये स्थान

RCB vs GG : सलग तिसऱ्या विजयासह RCB पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर, पराभवानंतर गुजरातचे स्थान घसरले
3

RCB vs GG : सलग तिसऱ्या विजयासह RCB पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर, पराभवानंतर गुजरातचे स्थान घसरले

IND vs NZ, T20 series : टी-२० विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरला लॉटरी!भारतीय टी-२० संघात मिळाली जागा, सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूला संधी
4

IND vs NZ, T20 series : टी-२० विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरला लॉटरी!भारतीय टी-२० संघात मिळाली जागा, सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूला संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.