केशव महाराज : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) संघ इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या (IPL 2024) गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचे आतापर्यत १३ सामने झाले आहेत. त्यामध्ये त्यांनी ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल २०२४ मध्ये प्लेऑफसाठी पात्र झालेला राजस्थान रॉयल्सचा दुसरा संघ आहे. मात्र, राजस्थान रॉयल्स त्यांचा शेवटचा साखळी सामना शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Raiders) खेळणार आहे. गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील.
[read_also content=”लखनौ सुपर जायंट्सने जर आज सामना जिंकला तर काय असेल प्लेऑफचे समीकरण? https://www.navarashtra.com/sports/if-lucknow-super-giants-win-the-match-today-ipl-2024-last-match-mumbai-indians-534369.html”]
नुकताच राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यापूर्वी केशव महाराज (Keshav Maharaj) यांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राजस्थान रॉयल्सचा खेळाडू केशव महाराज गुवाहाटी येथील मां कामाख्या देवी मंदिरात पोहोचला. जिथे या खेळाडूने प्रार्थना केली आणि आशीर्वाद घेतला आहे. केशव महाराज यांनी त्यांच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत केशव महाराज मंदिराच्या प्रांगणात हात जोडलेले दिसत आहेत. केशव महाजा यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक क्रिकेट चाहते त्यांच्या फोटो खाली त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.
गुणतालिकेचे समीकरण
आयपीएल 2024 च्या गुणतालिकेचा विचार केला तर कोलकाता नाईट रायडर्स 19 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. कालचा सामना रद्द झाल्यामुळे सनरायझर्स हैदराबाद 13 सामन्यांत 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. हे तिन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. बंगळुरू आणि चेन्नई यांच्यामध्ये शनिवारी १८ मे रोजी सामना रंगणार आहे या सामन्यांमध्ये ज्या संघाचा विजय होईल तो संघ प्लेऑफमध्ये एंट्री करणार आहे.